शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून लहान भावाने घेतला मोठ्या भावाचा जीव, चाकूने वार करून केली हत्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 23:53 IST

Crime News: लहान भावाने मोठ्या  भावावर चाकूने वार करीत निर्घुण हत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली.

अकोला -  हिवरखेड पोलीस ठाण्यातर्गंत येणाऱ्या तळेगाव बाजार येथे घरगुती वादातून लहान भावाने मोठ्या  भावावर चाकूने वार करीत निर्घुण हत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याप्रकरणी पोलिसांनी हरिदास गणेश मापे(३५) याला ताब्यात घेतले आहे. (Younger brother kills older brother in domestic dispute)

जागेच्या वादातून हे हत्याकांड घडल्याची गावात चर्चा आहे. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथे घरगुती कारणावरून शिवाजी गणेश मापे(४०) व हरिदास गणेश मापे(३५) यांच्यात गुरूवारी रात्री वाद झाला. वाद विकोपाला गेल्यामुळे आरोपी हरिदास मापे याने मोठा भाऊ शिवाजी मापे यांच्या छातीवर चाकूने वार करून त्याला जखमी केले. दोघेही भाऊ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजुला तळेगाव बाजार येथे राहतात. शिवाजी हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रस्त्यावर तब्बल दोन तास त्याचा मृतदेह पडून होता. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळावर गाठून मृतदेहाचा पंचनामा केला आणि आरोपी हरिदास मापे याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.

पोलीस पोहोचले दाेन तासांनंतर!तळेगाव बाजार येथे लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली. याबाबत ग्रामस्थांनी हिवरखेड पोलिसांना माहीती दिली. माहीती देऊनही पोलीस दोन तास घटनास्थळावर पोहोचले नसल्याची माहीती ग्रामस्थांनी दिली. दोन तासानंतर पोलिसांनी गावात येऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा ग्रामीण रूग्णालयात पाठविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला