शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

पेट्रोल टाकून जाळलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर :  ४० टक्के जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 20:23 IST

हिंगणघाट जळीत प्रकरणातील जखमी तरुणीवर स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनुसार ती ४० टक्के जळाली असून अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देनागपूरच्या खासगी इस्पितळात उपचार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भरचौकात एका तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात घडली. जखमी तरुणीवर स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनुसार ती ४० टक्के जळाली असून अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.अविवाहित असलेली २४ वर्षीय पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिक्षिका आहे. सोमवारी सकाळी घडलेल्या घटनेनंतर हिंगणघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्यावर उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहता हिंगणघाट पोलिसांनी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नुरुल अमीन, एन्टेन्सिव्हिस्ट तज्ज्ञ डॉ. शीतल चौहान यांच्या देखरेखीखाली कॅज्युअल्टी मेडिकल आॅफिसर डॉ. दीपक कोरे, जळीत तज्ज्ञ व प्लॅस्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवानवार यांनी तातडीने उपचाराला सुरुवात केली.हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, त्या तरुणीच्या तोंडावर पेट्रोल टाकल्याने ते श्वसननलिकेपासून ते अन्ननलिकेपर्यंत गेले असावे. यामुळे शरीरावरील व आतील जखमा गंभीर आहेत. पुढील ७२ तास त्या तरुणीसाठी महत्त्वाचे आहेत. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेली ही तरुणी ४० टक्के जळाली. यात तिचा चेहरा, मान, डोक्याचा भाग, डावा हात, छाती जळालेली आहे. श्वसननलिका जळाल्याने तिला श्वास घेण्यास कठीण जात आहे. डॉ. दर्शन रेवानवार यांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिला