शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणं १८ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले; माझ्याकडे आला नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 09:20 IST

काही दिवसांपूर्वी तो आणि त्याची पत्नी त्या महिलेकडे गेले आणि त्यांनी मुलासोबतचे संबंध संपवण्यास सांगितले.

भागलपूर – बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात एका १८ वर्षाच्या तरुणाची क्रूर हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अनैतिक प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं. या तरुणाला निर्दयपणे मारहाण करुन त्यानंतर गोळी झाडून मारण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेवर आणि तिच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवगछिया पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मीनिया टोला यांचा 18 वर्षांचा मुलगा कांती मंडल उर्फ ​​सिंटू याची निर्घृणपणे मारहाण केली त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार मारले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी घटनेत गंभीर जखमी झालेल्या सिंटूला उपचारासाठी मायागंज रुग्णालयात नेले पण त्याचा वाटेतच मृत्यू झाला. मृताच्या वडिलांनी याबाबत महिला, तिचा नवरा, भाऊ आणि इतरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

माझा मुलगा सिंटूने एका महिलेशी दोन वर्षांपासून अनैतिक संबंध ठेवले होते. काही दिवसांपूर्वी तो आणि त्याची पत्नी त्या महिलेकडे गेले आणि त्यांनी मुलासोबतचे संबंध संपवण्यास सांगितले. यावर महिला आणि सिंटू यांच्यात भांडण झाले. त्यावेळी जर सिंटू माझ्याकडे आला नाही तर मी त्याला गोळी घालेन अशी धमकी त्या महिलेने दिली होती असा आरोप सिंटूच्या वडिलांनी केला आहे.

रविवारी सकाळी या महिलेने सिंटूला भेटण्यास बोलवले, चौसा पोलिस ठाण्यांतर्गत अबकारी पोलीस चौकीच्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या शिवमंदिराजवळ ते दोघं भेटले, तेव्हा अज्ञात हल्लेखोरांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर सिंटूला गोळी मारुन तेथून पळ काढला. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आली नाही.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस