शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी जमविलेले पैसे खर्च केल्याने वडील रागावले, संतापाच्या भारात तरुणाने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 21:29 IST

शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेत केली आत्महत्या

जळगाव  - स्वत:च्या लग्नासाठी कुटुंबाने जमविलेले पैसे खर्च केल्याने त्यामुळे वडील रागावले व त्या संतापात आकाश बाळू ठाकरे (२३, रा. खडके चौक, शिवाजी नगर, जळगाव) या तरुणाने वराड, ता.जळगाव येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा केटरींगचे काम करायचा तर आई, वडील शिवाजी नगरातीलच कंपनीत कामाला आहेत. यंदा आकाश याचे लग्न करण्याचे नियोजन कुटुंबाने केले होते, त्यासाठी पैशांची जुळवाजुळव देखील झाली होती, काही रक्कम घरात होती. नेमके हेच पैसे आकाश याने खर्च केले. हा प्रकार समजल्यानंतर वडील बाळू ठाकरे त्याला आम्ही तुझ्या लग्नासाठी पै पै जमा करतो अन् तु पैसे खर्च करतो असे संतापात बोलले. आकाश याला त्याचा राग आला, त्यामुळे रविवारी त्याने सकाळीच घरातून पाय काढला. दुपारी भाऊ दीपक ठाकरे याला फोन करुन मी आता तुम्हाला सापडणारच नाही असे सांगून मोबाईल बंद केला. रात्री गाठले मावश्याचे गावआकाश याचे मावसे नारायण पुंडलिक जाधव हे वराड, ता.जळगाव येथे राहतात. त्यामुळे रविवारी रात्री आकाश हा वराड येथे गेला, मात्र मावश्याकडे गेला नाही. थेट शेतात गेला तेथे निंबाच्या झाडाला गळफास घेतला. सोमवारी सकाळी नारायण जाधव शेतात भरणा करण्यासाठी आले असता आकाश हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला. त्यांनी पोलीस पाटील देविदास पाटील व आकाशच्या कुटुंबाला माहिती दिली. पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, हवालदार शिवदास चौधरी, रतिलाल पवार, समाधान पाटील यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. तपास शिवदास चौधरी करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावSuicideआत्महत्या