कर्नाटकातून जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. येथे, एका तरुणाने आपल्या पत्नीवर धर्म बदलण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर ती त्याला असे न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही देत होती, असा आरोपही त्याने केला आहे. याशिवाय पीडित तरुणाने तिच्या कुटुंबावरही गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी बीएनएस अर्थात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, विशाल कुमार गोकावी नावाच्या एका व्यक्तीने म्हटले आहे की, तो गेल्या तीन वर्षांपासून तहसीन हुस्मानीसोबत रिलेशनमध्ये आहे. दोघांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये रजिस्टर मॅरेज केलं होतं. यानंतर तहसीनने मुस्लीम रीतीरिवाजांनुसार पुन्हा लग्न करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला.
यानतंर, शांतता राखण्यासाठी विशालनेही यास होकार दिला आणि एप्रिल २०२५ मध्ये मुस्लिम रीतीरिवाजांनुसार लग्न केले. आता विशालचा दावा आहे की, लग्न समारंभात त्याला न सांगता त्याचे नाव बदलण्यात आले. त्याने म्हटले आहे की, समारंभात एका मौलवीने त्याला न सांगताच त्याचे धर्मांतरण केले. या लग्न समारंभाचा व्हिडिओही समोर आल्याचे वृत्त आहे.
विशाल पुढे म्हणाला, यानंतर, ५ जून रोजी त्याचे कुटुंब हिंदू रितीरिवाजांनुसार लग्नाची तयारी करत होते, याला तहसीन हुस्मानीने सहमती दर्शवली होती. मात्र, नंतर तिच्या कुटुंबाच्या दबावाखाली तिने नकार दिला. दरम्यान, धर्म बदलला नाही, तर तुझ्या विरुद्ध घटला दाखल करेन, अशी धमकीही पत्नीने दिली होती, असा दावाही संबंधित पीडित तरुणाने केला आहे.
महत्वाचे म्हणजे, हुस्मानीने तिची आई बेगम बानोसह त्याला नमाज पठण करण्यास आणि जमातमध्ये जाण्यासही भाग पाडले, असा आरोपही विशालने केला आहे.