शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नशेच्या गोळ्यासाठी पैसे न दिल्याने तरूणाचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 17:04 IST

नऊ दिवसात शहरातील खूनाची ही तिसरी घटना आहे.

ठळक मुद्दे उपचारादरम्यान पहाटे ४.१० वाजता तरुणाचा मृत्यू झाला.

औरंगाबाद: नशेच्या गोळ्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तिघांनी एकाचा धारदार चाकूने भोसकून  खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री  पडेगावातील कासंबरी दर्गा परिसरात घडली. याविषयी छावणी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हेशाखेने मुख्य आरोपीला तर छावणी पोलिसांनी अन्य दोन जणांना बुधवारी दुपारी ताब्यात घेतले. नऊ दिवसात शहरातील खूनाची ही तिसरी घटना आहे.

सय्यद जमीर सय्यद जहीर (२५,रा. कासंबरी दर्गा परिसर, पडेगाव)असे मृताचे नाव आहे. तर मुख्य आरोपी सय्यद शाकेर अली सय्यद नासेर अली(२५,रा.कासंबरी दर्गा परिसर),शेख दाऊद उर्फ शहारूख नजमोद्दीन आणि सय्यद शहजाद अली सय्यद नासेर अली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि मृत हे एकाच कॉलनीतील रहिवासी आहेत. आरोपी सय्यद शाकेर हा सातवी शिकलेला आहे, मात्र तो इलेक्ट्रीकलची कामे करतो. त्याचा भाऊ सय्यद शहजाद अली आणि मृत जमीर हे परस्परांचे मित्र होते. जमीर आणि शहजाद यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी मृताने शहजादला मारहाण केली होती. ही बाब शहजादने त्याचा मोठा भाऊ सय्यद शाकेरला सांगितली होती.  

मंगळवारी रात्री बारा ते साडेबारा वाजेदरम्यान  सय्यद जमीर हा कासंबरी दर्गा परिसरातून घरी जात असताना  गट नंबर ८६ मधील हॉटेल सवेरासमोरील रिकामा भूखंड क्रमांक १८/१९ येथे आरोपींनी जमीरला  गाठले आणि त्याच्याकडे  नशेच्या गोळ्या खरेदी करण्यासाठी सय्यद शाकेरने पैशाची मागणी केली. जमीरने पैसे देण्यास नकार दिल्याने  आरोपींनी त्यास शिवीगाळ करून त्याच्यासोबत भांडण सुरू केले.  यावेळी आरोपी सय्यद शहजाद आणि शेख दाऊद यांनी त्याला पकडले तर आरोपी सय्यद शाकेरने त्याच्या पाठीवर, पोटात आणि मांडीवर चाकूने भोसकले. या घटनेत गंभीर जखमी होऊन जमीर खाली कोसळला. यांनतर आरोपी सय्यद शाकेर हा तेथून पसार झाला. 

या घटनेत  आपल्यावंर  बालंट येऊ नये, याकरीता आरोपी दाऊद उर्फ शहारूख याने गंभीर जखमी सय्यद जमीरला रिक्षातून घाटीत दाखल केले.तेथे उपचारादरम्यान पहाटे ४.१०वाजता सय्यद जमीरचा मृत्यू झाला. याघटनेप्रकरणी मृताचा भाऊ सय्यद जुने यांनी दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस