शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे अपहरण करून अत्याचाराचा प्रयत्न, तिघा परप्रांतीयांना अटक, ग्रामस्थ संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 08:20 IST

सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिंचोटी गावाच्या हद्दीत  तिच्या पाळतीवर असणाऱ्या तिघांनी तिला खेळाच्या मैदानात नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

अलिबाग : कामावरून घरी जात असलेल्या एका २० वर्षांच्या तरुणीचे तिघा परप्रातीयांनी अपहरण करून  तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी  रात्री चिंचोटी येथे घडली.  तरुणीने आरडाओरडा केल्यामुळे एका ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला आणि पुढचा अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी  संबंधित नराधमाला पकडून चोप दिला. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. 

पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून, ते सर्वजण परराज्यातील आहेत. एका औद्योगिक कंपनीत कंत्राटी कामगार आहेत. परिसरात  अनुचित घटना घडू नये यासाठी शनिवारी  पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. चिंचोटी गावात राहणारी एक तरुणी शुक्रवारी    नेहमीप्रमाणे  काम आटोपून  चालत घरी जात होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिंचोटी गावाच्या हद्दीत  तिच्या पाळतीवर असणाऱ्या तिघांनी तिला खेळाच्या मैदानात नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

पीडितेने आरडाओरड केली. रस्त्याने जाणाऱ्या एका बाईकस्वाराने तिचा आवाज ऐकल्याने त्याने धाव घेतली, त्यामुळे आरोपी पळू लागले. ही घटना गावात कळल्यावर ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तीनपैकी एक आरोपी हा ग्रामस्थांच्या हाती लागला. त्याला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. मात्र, तो वावे येथे पळून आला. ग्रामस्थांनी त्याला पुन्हा पकडले. या घटनेनंतर पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. फरार दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांसह मोठा फौजफाटा तैनात झाला होता. याप्रकरणी तिघा आरोपींवर अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडे कसून  चौकशी  करण्यात  येत असल्याचे  जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

लाठीचार्जमध्ये पीडितेचे वडील जखमीया घटनेतील एका आरोपीला ग्रामस्थांनी पकडून बेदम मारहाण केली होती. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला मारहाण झाली असल्याने त्याला रुग्णालयात नेणे गरजेचे होते. मात्र, आरोपींना आमच्या ताब्यात देण्याबाबत ग्रामस्थ आग्रही होते. पोलिस ग्रामस्थांना दीड तास समजावण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ते ऐकत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. त्यामध्ये पीडितेच्या पित्यालाही मार लागला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी