शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

 CAA विरोधात निदर्शने करणाऱ्यांवर अश्लील टिप्पणी केल्याने तरुण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 21:16 IST

 या घटनेमुळे दोन गटात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

 मडगाव - नागरिकत्व सुधारणा कायदयाविरोधात गोवा वुमन अगेंस्ट एनआरसी अ‍ॅंड सीएए संघटनेने केलेल्या निदर्शनावर सोशल मीडियावरून अश्लील भाष्य करून धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. साईप्रसाद नाईक (27) असे संशयिताचे नाव असून, तो दक्षिण गोव्यातील वासुदेवनगर - दवर्ली येथील रहिवाशी आहे. संशयिताला अटक करा अशी मागणी करत आज मुस्लिम धर्मिय मोठ्या संख्येने मडगाव पोलीस ठाण्यात जमले होते. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांचीही या जमावाने भेट घेउन त्यांच्याकडे संशयिताला त्वरित अटक करण्याची मागणी केली. नंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन मागाहून रितसर अटक केली.दरम्यान, आजच्या  या घटनेमुळे दोन गटात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने दवर्ली भागात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. संशयित दवर्ली येथे रहात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या भागात ज्यादा पोलीस कुमक ठेवली आहे. आयआरबी पोलीस पथक तेथे तैनात केले आहे.मडगावात काल  मंगळवारी  गोवा वूमन अ‍गेन्स्ट एआरसी अ‍ॅंड सीएए संघटनेने येथील पालिका इमारतीसमोरील उद्यानाजवळ निदर्शने  केली होती. फेसबुकवरून त्याची पोस्ट टाकली होती. या पोस्टवर संशयित साईप्रसाद याने अश्लील कॉमेन्टस केली होती. काल सकाळी या निदर्शकांनी पोलीस ठाण्यात येउन संशयितावर कारवाईची मागणी केली. अश्मा सय्यद यांनी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.भारतीय दंड संहितेंच्या 354 , 509 व 295 (अ) कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेऊन संशयितावर गुन्हा नोंद केला. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौतम सांळुके पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक