शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तू आणि सलमान फिक्स, एके ४७ ने उडवतो! खा. राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 07:26 IST

पुण्यातून राहुल तळेकर (वय २३) नामक स्टॉलचालक ताब्यात, राऊतांच्या निवाससस्थानी लावला बंदोबस्त

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावे जिवे मारण्याची धमकी व्हॉटस्ॲप नंबरवरून मिळाली आहे. ‘तू दिल्लीमध्ये भेट, तुला एके ४७ ने उडवतो मूसेवाला टाइप. तू आणि सलमान फिक्स...’ अशा आशयाची ही धमकी असून, या प्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांना कळविल्यानंतर पुण्यातून राहुल तळेकर (वय २३) नामक स्टॉलचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी संजय राऊत यांच्या मोबाइलवर धमकीचा मेसेज आला. या मेसेजमध्ये दिल्लीत आल्यास त्यांची एके-४७ ने हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी याची माहिती पोलिसांना मिळताच काही तासांतच तळेकरला ताब्यात घेण्यात आले. पुण्यातील खराडी भागात तो चालवत असलेल्या जयशंकर हॉटेलमधून रात्री उशिरा मुंबई पोलिस आणि पुणे पोलिस गुन्हे शाखा यांनी ही कारवाई केली. तळेकरला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे.

फोन उचलला नाही म्हणून...

- प्राथमिक चौकशीमध्ये तळेकरने संजय राऊत यांना त्यांच्या मोबाइलवर फोन केला होता. मात्र त्यांनी तो फोन उचलला नाही; त्यामुळे रागाच्या भरात त्याने राऊत यांना धमकीचा मेसेज केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.- त्याचा कोणा राजकीय पक्षाशी संबंध असल्याचे उघड झालेले नाही. तसेच तळेकरला गुन्हेगारी पार्श्वभूमीही नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.- त्याचा बिष्णोई टोळीशी संबंध आहे का, याबाबत अजूनही तपास सुरू असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.- मात्र, या प्रकारानंतर कांजूरमार्ग पोलिस ठाण्यातही तक्रार करण्यात आल्याचे त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

निवाससस्थानी लावला बंदोबस्त

राऊत यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. याआधीही राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या जिवाला धोका असल्याची माहिती दिली होती. बिष्णोई टोळीने अभिनेता सलमान खानला संपवण्याची धमकीही दिली आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSalman Khanसलमान खानPuneपुणे