शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक झाल्या एक दिवसाच्या "इन्चार्ज" पोलीस निरीक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 21:57 IST

Police News : जागतिक महिला दिनानिमित्त येरवडा पोलिसांनी राबवला अभिनव उपक्रम

ठळक मुद्दे महिला दिनाच्या निमित्ताने स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली ही संधी उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांनी यशस्वीपणे पार पाडली.

येरवडा - अवघ्या वर्षभरापूर्वी प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून पुणे शहर पोलीस दलात महिला पोलीस निरीक्षक म्हणून त्या रुजू झाल्या. येरवडा पोलीस स्टेशन येथे येऊन पंधराच दिवस पूर्ण केलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांना "जागतिक महिला दिना"निमित्त येरवडा पोलीस स्टेशनच्या प्रमुख "इन्चार्ज" वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून एक दिवसाची जबाबदारी देण्यात आली होती. महिला दिनाच्या निमित्ताने स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली ही संधी उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांनी यशस्वीपणे पार पाडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. 

 सोमवारी (8मार्च )रोजी सकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांना महिला दिनानिमित्त एक दिवस इन्चार्ज म्हणून पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळायची जबाबदारी सोपवली. स्वतःच्या खुर्चीत बसून वरिष्ठ निरीक्षकांनी त्यांना "चार्ज" दिला.सर्वप्रथम सकाळी पोलीस स्टेशन हजेरी वर जाऊन त्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कामकाजाबाबत सूचना दिल्या. त्यानंतर  पोलीस स्टेशन आवारातील लॉकअप  मधील आरोपींची माहिती घेतली. ठाणे अंमलदार यांच्याकडून रात्री उशिरा नंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांची व इतर आवश्यक माहिती घेतली. त्यानंतर हद्दीतील पेट्रोलिंग करता त्या रवाना झाल्या. पेट्रोलिंग दरम्यान नाकाबंदी तसेच मास्क कारवाईची देखील त्यांनी माहिती घेतली. राजीव गांधी हॉस्पिटल येथील आरोग्य सेविकांचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुन्हा पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार अर्ज तसेच इतर कामानिमित्त पोलीस स्टेशनला आलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांचे शंकासमधान केले. दुपारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी त्या रवाना झाल्या. बैठकी वरून आल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशन येथे महिला महिला दिनानिमित्त आयोजित संस्था-संघटना यांच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. महिला दिनाच्या निमित्ताने येरवडा पोलीस स्टेशन चा कारभार एक दिवस सांभाळण्याची जबाबदारी नवनियुक्त महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांनी यशस्वीपणे पार पाडली. जागतिक महिला दिनानिमित्त येरवडा सारख्या मोठ्या पोलिस स्टेशनच्या "इन्चार्ज" म्हणून पोलीस स्टेशन सांभाळण्याची जबाबदारी देण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे तसेच येरवडा पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी बहुमोल सहकार्य केले.

 अवघ्या चोवीस तासाच्या आत त्यांनी जोडला एक संसार....  महिला उपनिरीक्षक स्वाती ठाकूर येरवडा पोलिस स्टेशन येथे महिला सेलचे काम पाहतात. एका उच्चशिक्षित तरुणीने दिलेल्या तक्रार अर्जावरून त्यांनी समुपदेशन व कारवाई करत एक संसार यशस्वीपणे जोडला. एकाच उच्चभ्रु कंपनीत काम करणाऱ्या तरुण-तरुणींचे प्रेमसंबंध होते. परंतु त्या तरूणाने तरुणीला  लग्नाला नकार दिला होता. पीडित तरुणीने येरवडा पोलिसांकडे याबाबत तक्रार अर्ज दिला होता. पोलीस उपनिरीक्षक ठाकूर यांनी सदर तरुणाला रविवार 7 मार्च रोजी चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. दोघांचेही समुपदेशन करून तरुणाला कायदेशीर कारवाईची माहिती दिली. त्यानंतर तरुणाने तरुणीचा स्वीकार करीत जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विवाह केला. पोलीस उपनिरीक्षक स्वाती  ठाकूर यांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षपणामुळे तरुणीला तात्काळ न्याय मिळाला. तरुणाला चूक सुधारण्याची संधी मिळाली. कायदेशीर कारवाई टाळून अवघ्या चोवीस तासाच्या आत एक संसार सुरू झाला. याप्रकरणातील तरुण-तरुणींनी येरवडा पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :Policeपोलिसyerwada jailयेरवडा जेल