शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

झेरॉक्स काढून येतो सांगितले अन् दक्षता समिती बाहेर येताच फिनाईल केले प्राशन

By सागर दुबे | Updated: April 20, 2023 15:50 IST

या तरूणावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली.

जळगाव : मी कागदपत्रांची झेरॉक्स काढून येतो असे वडिलांना सांगून पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयाबाहेर निघाल्यानंतर अनंता अशोक उमाळे (३०,रा.वरणगाव) या तरूणाने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडला. या तरूणावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली.

वरणगाव येथील अनंता उमाळे हा तरुण मुंबईतील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचा भुसावळातील एका तरुणीसोबत विवाह झाला. मात्र, कौटूंबिक वादातून सहा महिन्यांपासून पत्नी माहेरी राहत आहे. काही महिन्यांपूर्वी पत्नीने उमाळे यांच्याविरूध्द पोलिस अधीक्षक कार्यालय आवारातील महिला दक्षता समितीकडे तक्रार केली आहे. त्यामुळे गुरूवारी पती-पत्नी आपआपल्या कुटुंबियांसह महिला दक्षता समिती येथे तारखेवर आले होते. समितीकडून दोघांमध्ये तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पती-पत्नीमध्ये तडजोड न झाल्यामुळे त्यांच्याकडून लेखी लिहून समितीने दोघांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.

बॉटल काढून प्यायला फिनाईल...दक्षता समितीत दोघांकडून लेखी स्वरुपात लिहून घेतल्यानंतर उमाळे हा मी कागदपत्रांची झेरॉक्स काढून आणतो असे वडीलांना सांगून कार्यालयाबाहेर बाहेर जावू लागला. त्याचवेळी बॉटलमध्ये आणलेले फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तो खाली कोसळला. त्याच्या कुटूंबियांसह इतर पोलिस कर्मचारी व नागरिकांनी त्याला उचलून रिक्षातून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविले. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मुलगा त्याच्या पत्नीला नांदविण्यास तयार होता, तिने नकार दिल्यानंतर त्याने कार्यालयाबाहेर येवून फिनाईल पिल्याचे अनंता याच्या कुटूंबियांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी