शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिराच्या प्रेमात पडली वहिनी, पतीला मारण्यासाठी बोलवले सुपारी किलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:53 IST

Crime News : पोलिसांनी सांगितलं की, पप्पूच्या हत्येसाठी नवगछियाच्या गोपालपूरहून शूटर्स बोलवून हत्याकांड घडवून आणलं. या हत्येचा खुलासा आरोपींच्या मोबाइल सीडीआरमधून झाला.

Crime News : बिहारच्या (Bihar) किशनगंजमधून पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने दिरासोबत मिळून सुपारी किलरकडून पतीची हत्या केली. पोलिसांनी एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या पप्पू हत्याकाडांचा खुलासा केला. पोलिसांनी दीर आणि वहिनीच्या षडयंत्राचा खुलासा करत मृतकाची पत्नी प्रीती गुप्ता आणि दीर राजू गुप्तासोबत शूटर सूरज याला अटक केली. या हत्याकाडांत सहभागी इतर शूटर्सचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, पप्पूच्या हत्येसाठी नवगछियाच्या गोपालपूरहून शूटर्स बोलवून हत्याकांड घडवून आणलं. या हत्येचा खुलासा आरोपींच्या मोबाइल सीडीआरमधून झाला. आरोपींना अटक करण्यासोबतच पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले मोबाइल फोन, पिस्तुल, चाकू आणि इतर साहित्यही ताब्यात घेतले. 26 जुलैला रात्री ड्युटीहून घरी येत असलेल्या पप्पूवर अज्ञातांनी गोळी झाडली. ज्यात तो जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली होती.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी एक टीम तयार केली. एसआयटीने टेक्नीकचा वापर करत घटनेत सहभागी लोकांची ओळख पटवली. त्यानंतर तीन गुन्हेगारांना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान पोलिसांना समजलं की, मृतकाची पत्नीचं तिच्या दिरासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. पप्पू त्यांच्यात अडचण ठरत होता. ज्यामुळे ही हत्या करण्यात आली.

मृतकाची पत्नी प्रीती कुमारी एमजीएम हॉस्पिटलमध्ये बीएससी नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थीनी आहे. पोलिसांना चौकशी दरम्यान समजलं की, दीर-वहिनीने पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर दोघांनी पप्पूचा खात्मा करण्याचा प्लान केला. यासाठी त्यांनी सुपारी किलरची मदत घेतली. एक लाख रूपयात डील झाली आणि 20 हजार रूपये अॅडव्हांस देण्यात आले. पप्पू गुप्ताची रेकी करण्यात आली. त्याच्यावर हल्ला झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी