शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जुगारात हरल्यावर पतीने जुगाऱ्यांना पत्नीवर करू दिला बलात्कार, विरोध केल्यावर फेकले अ‍ॅसिड

By बाळकृष्ण परब | Updated: December 15, 2020 09:58 IST

Crime News : पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका पतीने जुगारामध्ये आपल्या पत्नीला पणाला लावले. पत्नीला जुगारात हरल्यावर पतीच्या इशाऱ्यावर पाच ते सहा जणांनी या महिलेवर बलात्कार केला.

ठळक मुद्देबिहारमधील मोजाहिदपूर परिसरात घडली पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटनासंबंधित महिलेने विरोध केल्यावर पतीने अ‍ॅसिड फेकून तिला केले जखमी आपल्या प्रायवेट पार्टमध्येही अ‍ॅसिड टाकण्यात आल्याचा पीडित महिलेने केला आरोप

भागलपूर (बिहार) - बिहारमधील मोजाहिदपूर परिसरात पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका पतीने जुगारामध्ये आपल्या पत्नीला पणाला लावले. पत्नीला जुगारात हरल्यावर पतीच्या इशाऱ्यावर पाच ते सहा जणांनी या महिलेवर बलात्कार केला. तसेच संबंधित महिलेने विरोध केल्यावर पतीने अ‍ॅसिड फेकून तिला जखमी केले. यादरम्यान, आपल्या प्रायवेट पार्टमध्येही अ‍ॅसिड टाकण्यात आले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.ही घटना दोन नोव्हेंबर रोजी घडली होती. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा संबंधित महिलेच्या जबाबानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या विवाहाला दहा वर्षे झाली आहेत. मात्र दहा वर्षांत तिला मुलबाळ झालेले नाही. त्यामुळे तिचा पती तिचा छळ करत असे. त्याने आपल्या पत्नीला जुगारात पणाला लावले होते. दरम्यान, वैद्यकीय तपासणीमधील अहवालानंतरच याबाबतची माहिती समोर येणार आहे.पीडित महिलेने सांगितले की, मी कसाबसा जीव वाचवून जखमी अवस्थेत माहेरी पोहोचले. दरम्यान, या महिलेच्या कुटुंबीयांनी तिला गंभीर अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर सदर महिलेने स्थानिक भाजपा नेते दीपक सिंह यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी संबंधित महिलेची व्यथा ऐकल्यानंतर याबाबतची माहिती एसएसपी आशिष भारती आणि मोजाहिदपूर पोलीस ठाण्याला दिली. आता मोजाहिदपूर आणि महिला ठाण्याचे पोलीस याबाबतचा तपास करत आहेत.पीडित महिलेसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात तपास करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे. या प्रकरणात जे दोषी असतील. त्यांना कुठल्याही प्रकारे सोडले जाणार नाही, असे भागलपूरचे सिटी एएसपी पूरन कुमार झा यांनी सांगितले.काल रात्री पीडित महिलेने दिलेल्या जबाबाच्या आधारावर महिला ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी पतीला अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. आता घटनेचा अधिक सखोलपणे तपास केला जात आहे, असे भागलपूरचे एएसपी आशिष भारती यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारBiharबिहार