शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याच्या तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; दीड महिन्यानंतर तक्रार, आरोपी प्रॉपर्टी डिलरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 23:12 IST

गुळ घेऊन आलेल्या धुळ्याच्या एका तरुणीवर आपल्या वाहनात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सीताबर्डी पोलिसांनी एका प्रॉपर्टी डिलरला अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - गुळ घेऊन आलेल्या धुळ्याच्या एका तरुणीवर आपल्या वाहनात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सीताबर्डी पोलिसांनी एका प्रॉपर्टी डिलरला अटक केली.

राजेंद्र विशंभर थोरात (वय ५५) असे आरोपीचे नाव असून तो वर्धा मार्गावर राहतो. त्याचा मित्र छिंदवाड्याला (मध्यप्रदेश) राहतो. त्याची एक कंपनी असून या कंपनीत धुळ्याची तरुणी (वय २२) काम करते. कंपनीच्या कामाने ती नोव्हेंबर महिन्यात छिंदवाडा येथे गेली होती. त्याचवेळी थोरात याने त्याच्या मित्राला (तरुणी ज्या कंपनीत काम करते, त्याच्या संचालकाला) छिंदवाड्यात उच्च दर्जाचा गुळ मिळतो तो पाठव, असे म्हटले होते. त्यानुसार मित्राने तरुणी परत येत असताना तिच्याकडे गुळ आणि थोरातचा मोबाईल नंबर देऊन तो त्याच्याकडे सोपविण्यास सांगितले होते.

२२ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता तरुणी मध्यप्रदेश बसस्थानकावर आली अन् तिने थोरातला फोन करून गुळ घेऊन जाण्यासाठी बोलविले. थोरात त्याच्या कारने तेथे गेला. त्याने तरुणीला आपल्या वाहनात बसवून सीताबर्डीतील एका मोठ्या रेस्टॉरेंटमध्ये नेले. खाऊपिऊ घातल्यानंतर त्याने तिला फिरवण्याच्या बहाण्याने सदर पोलीस ठाण्यासमोरून सेमिनरी हिल्सला नेले. तेथे कार थांबवून त्याने तिच्याशी अश्लिल चाळे करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने तीव्र विरोध करून आरडाओरड केली. त्यामुळे तो घाबरला अन् त्याने तिला सीताबर्डीत आणून सोडले. यानंतर तरुणी आपल्या गावाला निघून गेली.४४ दिवसांनंतर तक्रारबुधवारी कंपनीच्या संचालकासह तरुणी नागपुरात आली आणि तिने सीताबर्डी ठाण्यात थोरातविरुद्ध अतिप्रसंगाची तक्रार नोंदवली. घाबरली होती. बदनामीचा धाक होता. मात्र, गावातील मित्र अन् कंपनी संचालकांनी धाडस दिल्याने तक्रार नोंदवित असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. ठाणेदार अतुल सबनिस यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करून त्याची ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळवली. आरोपी थोरातने गुन्ह्याचा ईन्कार केला आहे. मित्राकडे (कंपनी संचालक) रक्कम आहे, ती परत द्यायची नसल्याने त्याने कुंभाड रचल्याचे थोरात पोलिसांना सांगत आहे.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी