शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गळा कापून महिला डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 17:36 IST

प्रकृती चिंताजनक : मार्डच्या हॉंस्टेलमध्ये घडली घटना 

नागपूर - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असेलल्या एका महिला डॉक्टरने स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी १०.३० वाजता येथील मार्डच्या हॉंस्टेलमध्ये ही घटना उघडकीस आली. त्यामुळे हॉंस्टेल परिसरात खळबळ उडाली आहे. अश्विनी मयूर शिंदे (वय २६) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. अश्विनी मुळच्या बीड येथील रहिवासी आहेत. त्या डीओआरएल अभ्यासक्रमासाठी नागपुरात आल्या होत्या. मेडिकल परिसरातील मार्डच्या  हॉंस्टेलमध्ये ४२ क्रमांकाच्या रूममध्ये त्या राहत होत्या. डॉ. श्रुती तागडे आणि अन्य एक अशा दोन मैत्रीणी त्यांच्यासोबत राहायच्या. आज सकाळी १० वाजले तरी डॉ. अश्विनी लेक्चरला पोहचल्या नाही. त्यामुळे डॉ. श्रुती त्यांच्या रूमवर गेल्या. दार आतून बंद असल्यामुळे बराच वेळ त्यांनी दार ठोठावले. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बाजुच्या खिडकीतून त्यांनी डोकावून बघितले असता अश्विनी पलंगावर पडली असल्याचे दिसले. त्यांच्या गळ्यातून रक्त वाहत होते. त्यामुळे डॉ. श्रुती यांनी आरडाओरड करून बाजुच्यांना गोळा केले.  हॉंस्टेलच्या कर्मचाऱ्यांनी दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. गंभीर अवस्थेतील डॉ. अश्विनी यांना तातडीने अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनी स्वत:चा गळा सर्जिकल ब्लेडने कापून घेतल्याचा अंदाज आहे. बराच रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची अवस्था चिंताजनक आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या