लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : सोशल मिडीयाच्या माध्यमातून तरूणाला मोहित करून त्याच्यासोबत व्हिडिओ कॉलवर अश्लील संभाषण व कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या एका महिलेविरुद्ध नांदुरा येथील ३४ वर्षाच्या व्यक्तीने पोलिस स्टेशनला तक्रार दिली.शहरातील एका सुशिक्षीत कुटुंबातील ३४ वर्षीय व्यक्तीस ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मोबाईक क्रमांकावरून व्हॉट्स अप व्हिडिओ कॉल आला. दरम्यान, त्या व्यक्तीने तो काॅल रिसीव्हही केला. त्यानंतर एक अनोळखी महिलेने काही बोलणे झाल्यानंतर ‘तुम्हारे सिवा मेरा ईस दुनियामें कौन?, असे म्हणत असताना कपडे काढले. गैरप्रकार दिसुन येताच त्या व्यक्तीने लगेच आपला मोबाईल बंद केला. या प्रकारानंतर लगेच त्यावरील मोबाईल क्रमांकावरून एका पुरूषाने कॉल करून तुमचा व्हिडीओ तयार केला आहे, व ५००० रुपये पाठविण्याचे सांगितले. पैसे नाही दिले तर तुमचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हॉयरल करण्याची धमकी दिली. यानंतर पुन्हा दोन, तीन वेळा कॉल करून, शिविगाळ करून धमकी दिली. सुरूवातीला घाबरलेल्या व्यक्तीने मित्रांच्या सल्ल्याने पोलिस स्टेशन गाठले. पोलिस प्रशासनाने युवकाची समजून काढून रितसर तक्रार नोंदऊन घेत आर्थिक फसवणुकीपासुन वाचविले. तसेच घाबरलेल्या व्यक्तीचे मनोधैर्य वाढविले. पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.
‘तुम्हारे सिवा मेरा ईस दुनियामें कौन', असे म्हणत महिलेने कपडे काढले अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 11:23 IST
Woman's attempt to cheat : एका महिलेविरुद्ध नांदुरा येथील ३४ वर्षाच्या व्यक्तीने पोलिस स्टेशनला तक्रार दिली.
‘तुम्हारे सिवा मेरा ईस दुनियामें कौन', असे म्हणत महिलेने कपडे काढले अन्...
ठळक मुद्देव्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा महिलेचा प्रयत्नतुमचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हॉयरल करण्याची धमकी दिली.