नालासोपारा : शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीने २९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करत त्याची व्हीडिओ क्लिप बनवल्याची घटना उघड झाली आहे. या क्लिपद्वारे बदनामीची धमकी देत तिच्याकडून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कमही लंपास केल्याचा हा प्रकार नालासोपारा पूर्वेकडील परिसरात घडला. याप्रकरणी पिडीतेने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पीडितेला गुंगीकारक औषध देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच याची व्हीडिओ क्लिप बनवून त्याद्वारे बदनामी करण्याची धमकी देत दागिने आणि रोख रक्कम घेत आणखी पैशांची मागणी केल्याचे समोर येत आहे. पीडितेच्या तक्र ारीवरून तुळिंज पोलिसांनी आरोपी विरोधात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.आरोपी आब्बास फिरोज प्रतापपूरवाला याने २०१६ पासून आजपर्यंत पिडीतेशी जवळीक साधली. तिला तसेच तिच्या मुलाला केक आणि थंड पेयातून काहीतरी गुंगीचे औषध टाकून ते जबरस्तीने पाजून बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला आणि याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून ठेवले.
नालासोपाऱ्यात शेजाऱ्यानेच केला महिलेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 00:27 IST