शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय : दगडाने ठेचून पत्नीची हत्या; पतीस अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 18:38 IST

वाडेगाव (जि. अकोला): एका महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना बाळापूर तालुक्यातील वाडेगाव नजीकच्या धनेगाव शेतशिवारात शुक्रवारी उघडकीस आली.

वाडेगाव (जि. अकोला): चारित्र्यावर संशय घेणाºया पतीने दगडाने ठेचून पत्नीची हत्या केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी वाडेगाव जवळच असलेल्या धनेगाव शिवारात उघडकीस आली. बबिता आकाश हिवराळे (२४) रा. चितोडा, ता. खामगाव, जि. बुलडाणा असे मृतक महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बाळापूर पोलिासांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून मृतक महिलेचा पती आकाश प्रभाकर हिवराळे यास अटक केली. वाडेगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या धनेगाव शेतशिवारातील डॉ. नीलेश घाटोळ यांच्या शेतात शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती समजताच धनेगावचे पोलीस पाटील प्रमोद लांडे यांनी वाडेगाव पोलीस चौकीला कळविले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वैभव पाटील व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळ गाठले, तसेच ठसे तज्ज्ञानांही घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. मृतक महिलेच्या डोक्यावर दगडाने वार करून तिची हत्या करण्यात आली. तसेच महिलेची हत्या करून मृतदेह धनेगाव शेतशिवारात फेकून देण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान मृतक महिलेजवळ एक चिठ्ठी आढळली. त्यात मोबाइल क्रमांक लिहलेला होता. त्या आधारावर ही मृतक महिला बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चितोळा येथील रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाचा तपास करून सहायक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र अहेरकर, विजय जमनिक, संजय वाघ, गोवर्धन इंगळे यांनी तपास करून अवघ्या काही तासातच महिलेचा पती आकाश प्रभाकर हिवराळे यास अटक केली. चारित्र्यावर संशय घेऊन आकाश हिवराळे याने बबिताची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखून