शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

तू पुन्हा आलीस? वारंवार होणाऱ्या अपमानाचा घेतला सूड; सुनेने सासर्‍याला जमिनीवर आपटून संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:18 IST

दिल्लीत एका सूनेने तिच्या सासऱ्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Delhi Crime: एका ३२ वर्षीय महिलेने आपल्या ६२ वर्षीय सासर्‍याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील द्वारका येथील बिंदापूर भागात घडली आहे. मृत व्यक्ती भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेले इंजिनीअर होते. सुरुवातीला हा वाद मालमत्तेसाठी असल्याचे वाटत असले, तरी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सुनेने जो खुलासा केला आहे, तो थक्क करणारा आहे.

आरोपी गीता (वय ३२) हिचा पती प्रवीण गेल्या ५ वर्षांपासून हैदराबादमध्ये कामाला आहे. गीता आपल्या ४ वर्षांच्या मुलासह पतीच्या स्वतःच्या घरात राहत होती. ऑगस्टमध्ये सासूच्या निधनानंतर, सासरे नरेश कुमार, त्यांचा मुलगा कपिल आणि मुलीने गीताला बिंदापूर येथील घरी राहायला बोलावले. मात्र हे तिच्यासाठी अपमानाकारक वाटले.

"तू पुन्हा आलीस?" शेजाऱ्यांच्या टोमण्याने गेली वैतागून

गीताने पोलिसांना सांगितले की, तिचे सासरचे लोक तिला बिंदापूरला राहायला बोलवत आणि काही दिवसांतच घर सोडून जायला सांगत. असे ६ ते ७ वेळा घडले. जेव्हा ती पुन्हा बिंदापूरला यायची, तेव्हा शेजारी तिला तू पुन्हा आलीस का? म्हणून हिणवायचे. लोकांच्या नजरेत आपण चेष्टेचा विषय बनलो आहोत, या भावनेने गीता प्रचंड संतापलेली होती. २६ डिसेंबरच्या रात्री सासर्‍यांनी तिला पुन्हा घर सोडून जाण्यास सांगितले, तेव्हाच तिने त्यांच्या हत्येचा कट रचला.

गच्चीवर घडला थरार

२७ डिसेंबर रोजी नरेश कुमार ऊन घेण्यासाठी गच्चीवर गेले होते. हीच संधी साधून गीता तिथे पोहोचली. तिने सासर्‍यांना जोरात धक्का देऊन जमिनीवर पाडले, त्यांच्या छातीवर बसली आणि त्यांचे डोके सिमेंटच्या जमिनीवर अनेकवेळा जोरात आपटले. एवढ्यावरच न थांबता तिने सासर्‍यांचा गळा दाबून त्यांचा जीव घेतला.

विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना गीताचा ४ वर्षांचा मुलगा आणि नरेश कुमार यांची १३ वर्षांची मुलगी यांनी प्रत्यक्ष पाहिली. घाबरलेल्या चिमुरड्याने आपल्या आत्याला  सांगितले की, "आई आजोबांना मारतेय." जेव्हा ती मुलगी गच्चीवर धावत गेली, तेव्हा तिला गीता सासर्‍यांवर हल्ला करताना दिसली. तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंदापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करून गीताला अटक केली आहे. गीताचा पती प्रवीण यानेही तिच्या दाव्याची पुष्टी केली असून, त्याने कबूल केले की सासरच्या घरी तिचा वारंवार अपमान होत असे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस