शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दगडाने ठेचून महिलेचा खून; आराेपीला ६ दिवसांची काेठडी

By राजकुमार जोंधळे | Updated: December 26, 2022 21:03 IST

मदन ऊर्फ मनाेज कदम याने महिलेच्या कपाळावर, डाेक्यावर, ताेंडावर दगडाने ठेचून खून केला.

लातूर : येथील म्हाडा काॅलनीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या आराेपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पाेलिस ठाण्याच्या पथकाने आवळल्या. त्याला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील म्हाडा काॅलनीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह वासनगाव शिवारातील एका ढाब्याच्या पाठीमागील माेकळ्या जागेत मंगळवार, २० डिसेंबर राेजी सकाळी आढळून आला. मदन ऊर्फ मनाेज कदम याने महिलेच्या कपाळावर, डाेक्यावर, ताेंडावर दगडाने ठेचून खून केला. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, घटनेनंतर आराेपी मदन कदम याने पाेलिसांना गुंगारा देत पलायन केले हाेते. त्याच्या अटकेसाठी लातूर ग्रामीण पाेलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अशी दाेन स्वतंत्र पथके मागावर हाेती.

आराेपी मदन कदम हा औसा ते निलंगा मार्गावरील करजगाव पाटी परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पाेलिस पथकाने माेठ्या शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या.आराेपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पाेलिस निरीक्षक गणेश कदम यांनी दिली. लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर