शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या प्रेमसंबंधांतून महिलेवर चाकूने वार, व्हॅलेंटाईनदिनी केला हल्ला; दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 02:46 IST

Crime News : नमिता ही कोविड कालावधीत केईएम रुग्णालयात कंत्राटी स्वरूपात कामाला आहे. काळेशी तिचे पूर्वी प्रेमसंबंध होते. १४ फेब्रुवारीला दुपारी पावणे तीनच्या सुमरास तो तिला भेटण्यासाठी रुग्णालयाजवळ, बाटलीवाला रोडवर आला.

मुंबई : जुन्या प्रेमसंबंधातून एकाने महिलेवर धारदार चाकूने वार केल्याची घटना परळ येथील केईएम हॉस्पिटलजवळ घडली. व्हॅलेंटाईन दिनी घडलेल्या या हल्ल्यात नमिता साबळे (बदललेले नाव, वय ३७) गंभीर जखमी झाल्या, तर झटापटीत हल्लेखोर राजेश काळे (३६, रा. कुर्ला सिग्नल ब्रिजखाली, कुर्ला पूर्व) याच्या पायाला चाकू लागला. दोघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नमिता ही कोविड कालावधीत केईएम रुग्णालयात कंत्राटी स्वरूपात कामाला आहे. काळेशी तिचे पूर्वी प्रेमसंबंध होते. १४ फेब्रुवारीला दुपारी पावणे तीनच्या सुमरास तो तिला भेटण्यासाठी रुग्णालयाजवळ, बाटलीवाला रोडवर आला. आपल्यासाेबत संबंध का ठेवत नाही, असे विचारत त्याने तिच्याशी वाद घातला. सोबत आणलेल्या धारदार चाकूने तिच्या पोटावर वार केले. झटापटीत राजूच्या पायाला चाकू लागला. तिने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक तेथे जमले. त्यांनी राजेशला पकडले. त्यानंतर दाेघांनाही उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर राजेशला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी