शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

हत्येनंतर ‘तिचा’ मृतदेह घेऊन भारतीय प्रियकर ४५ मिनिटं दुबईच्या रस्त्यावर कारने फिरला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 10:17 IST

मागील ५ वर्षापासून प्रियकराचे प्रेयसीसोबत संबंध होते. अलीकडेच या प्रेयसीचे दुसऱ्याशी संबंध आहे समजताच या दोघांमध्ये भांडण झाले होते.

दुबई – यूएईच्या दुबई कोर्टाने रविवारी निवासी भारतीयावर प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप निश्चित केला आहे. मूळ भारतीय असणाऱ्या या प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह गाडीत बसवून शहरात फिरत असल्याची खळबळजनक घटना घडली. जवळपास ४५ मिनिटं हा प्रियकर मृत प्रेयसीचा मृतदेह गाडीत बसवून शहरात चक्कर मारत होता. त्यानंतर त्याने पोलिसांकडे जावून स्वत:ला अटक करुन घेतली.

रविवारी या प्रकरणी कोर्टात सुनावणी होती. यावेळी आरोपी प्रियकराने त्याचा गुन्हा कबूल केला. मृतक प्रेयसीचे अन्य पुरुषासोबत संबंध असल्याने प्रियकराचा राग अनावर झाला त्यातून त्याने प्रेयसीची हत्या केली. प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबला त्यात तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने मुरकाब्बात पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हा कबूल केला. स्थानिक माध्यमानुसार आरोपीने त्याची गाडी पोलीस ठाण्यात आणली आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

मागील ५ वर्षापासून प्रियकराचे प्रेयसीसोबत संबंध होते. अलीकडेच या प्रेयसीचे दुसऱ्याशी संबंध आहे समजताच या दोघांमध्ये भांडण झाले होते. प्रेयसी आपला विश्वासघात करत असल्याची भावना प्रियकराच्या मनात निर्माण झाली होती. आरोपीने पोलिसांना सांगितले की, या घटनेबाबत प्रेयसीच्या घरच्यांनाही ईमेलवरुन सांगितले होते. जर तुम्ही तुमच्या मुलीला समजावलं नाही तर मी तिची हत्या करेन असं प्रियकराने ईमेलमध्ये लिहिलं होतं.  

पोलिसांच्या माहितीनुसार, एका मॉलच्या बाहेर हे दोघं पार्किंगमध्ये गाडीत बसले होते. यावेळी अनैतिक संबंधावरुन दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं. प्रियकराचा राग अनावर झाल्याने त्याने प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह कारमध्येच ठेऊन एका रेस्टॉरंटमध्ये जावून त्याने जेवण आणि पाण्याची बॉटल ऑर्डर केली. जवळपास ४५ मिनिटे कार शहरात फिरवल्यानंतर त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी प्रेयसीच्या वकिलांकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :MurderखूनcarकारDubaiदुबई