शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

संशय महागात पडला; पतीचा मोबाईल तपासणाऱ्या पत्नीला कोर्टाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 19:42 IST

न्यायालयानं पत्नीला दंड भरण्याचे आदेश दिले

अबूधाबी: पतीच्या अपरोक्ष त्याचा मोबाईल तपासून पाहणं एका महिलेला महागात पडलं आहे. या प्रकरणी न्यायालयानं पत्नीला दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय पत्नीला होता. त्यामुळेच तिनं पतीचा फोन तपासला आणि त्याचे काही मेसेजदेखील कॉपी केले. त्यामुळे पतीनं पत्नीला न्यायालयात खेचलं. 'खलीज टाईम्स'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. महिलेनं पतीचे मेसेज तिच्या दुसऱ्या फोनवर ट्रान्सफर केले. पतीच्या अपरोक्ष तिनं ही कृती केली. त्यामुळे अल-खैमा मिसडेमीनर न्यायालयानं तिला ३००० दिरमचा (५६ हजार रुपये) दंड ठोठावला. याशिवाय पतीला न्यायालयीन खटल्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणून १०० दिरम देण्याचेही आदेश दिले. यानंतर न्यायालयानं हे प्रकरण सरकारी वकिलाकडे पाठवलं. पती आणि चॅटिंग करणाऱ्या महिलेची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयानं वकिलाला दिले. मोबाईल तपासून मेसेज कॉपी करणाऱ्या पत्नीविरोधात पतीनं न्यायालयात धाव घेतली. यामुळे गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग झाल्याची तक्रार पतीनं केली. यानंतर रास अल खैमा पोलिसांनी पत्नीला समन्स बजावलं. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर पत्नीनं तिचा गुन्हा कबूल केला. मात्र पतीचे एका महिलेसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप तिनं केला. संबंधित महिला आणि पती कायम चॅटिंग करतात. त्याच संशयातून मोबाईल तपासल्याचं पत्नीनं न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.