शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ४० कोटी रूपयांच्या संपत्तीसाठी महिलेचा खून, आरोपी पती आणि मुलीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 11:44 IST

Husband and Daughter Killed Women : पोलिसांनी सांगितलं की, पती आणि मुलीने मृत महिला अर्चनाची संपत्ती मिळवण्यासाठी तिच्या हत्येचा प्लान केला होता. पोलिसांनी सांगितलं की, प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेज व तक्रारीच्या आधारावर चौकशी केली गेली.

कर्नाटक (Karnataka) पोलिसांनी एका महिलेच्या हत्येच्या केसचा छडा लावत सात आरोपींना अटक केलीये. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींमध्ये मृत महिलेचा पती आणि तिची मुलगीही (Husband and Daughter Killed Women) आहे. २७ डिसेंबरच्या रात्री अर्चना रेड्डी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागचं मुख्य कारण ४० कोटी रूपयांची संपत्ती होती. पोलीस म्हणाले की, आरोपींनी त्यांचा गुन्हा मान्य केलाय. मृत महिलेच्या मुलाने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. 

पोलिसांनी सांगितलं की, पती आणि मुलीने मृत महिला अर्चनाची संपत्ती मिळवण्यासाठी तिच्या हत्येचा प्लान केला होता. पोलिसांनी सांगितलं की, प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेज व तक्रारीच्या आधारावर चौकशी केली गेली. त्यानंतर सगळं सत्य समोर आलं. मृत महिलेचा पती नवीनने पाच लोकांसोबत आपल्या पत्नीवर हल्ला केला. तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली.

पोलिसांनी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, मृत महिलेचा पती तिच्यावर चाकूने हल्ला करताना दिसत आहे. त्याच्यासोबत आणखी पाच लोक दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पती नवीनच्या अनैतिक संबंधांची माहिती पत्नीला होती. तेच पतीला या गोष्टीचा संशय होता की, त्याच्या पत्नीचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध सुरू आहेत. यावरून घरात अनेकदा वाद होत होते.

डीसीपी श्रीनाथ एम जोशी यांच्यानुसार, मृत महिलेचा दुसरा पती नवीन कुमार आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या मुलीला संशयित म्हणून अटक केली आहे. असा अंदाज आहे की, वडील आणि मुलीने महिलेची संपत्ती हडपण्यासाठी तिची हत्या केली.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारी