शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दादरला महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं अन् चेंबूरला आरोपी झाला गजाआड...

By गौरी टेंबकर | Updated: September 14, 2022 19:34 IST

१२ तासांत दादर जीआरपीने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दादर रेल्वे स्थानकावरून डोंबिवलीला जाण्यासाठी लोकल पकडत असताना एका महिलेच्या गळ्यातून अडीच लाखांचे दागिने हिसकावून सराईत पसार झाला होता. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर दादर रेल्वे पोलिसांनी अवघ्या १२ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. शेखर विजय शिंदे (३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्रकरणातील तक्रारदार श्रीराम मुलकुटला हे ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या पत्नीसह डोंबिवलीला जाण्यासाठी दादरला साडे चारच्या सुमारास लोकल पकडत होते. त्यावेळी पत्नीच्या गळ्यातील सव्वा दोन लाखांचे मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने हिसकावत पळ काढला. याची तक्रार त्यांनी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने तपास सुरू करत सीसीटिव्ही फुटेज पडताळले. त्यावेळी आरोपीची ओळख पटली आणि तो अभिलेखावरील गुन्हेगार शिंदे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार त्याचा माग काढत चेंबूर परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबूली दिली. तेव्हा  त्याच्या कडून चोरीला गेलेले मंगळसूत्र ढाकणे यांच्या पथकाने हस्तगत केले. ते तक्रारदाराला पोलिसांनी परत केले म्हणून कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस