शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"गर्लफ्रेंडच्या इशाऱ्यावर नाचतो, आता मला जवळही घेत नाही", पोलीस ठाण्यात पतीविरोधात पत्नीचा आक्रोश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 15:52 IST

लग्नानंतरही पतीनं त्याच्या गर्लफ्रेंडला सोडलं नाही. गेल्या चार वर्षांपासून तिच्याच इशाऱ्यावर तो नाचतो आहे, अशी तक्रार घेऊन एक पत्नी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि पतीविरोधात आक्रोश सुरू केला.

आग्रा-

लग्नानंतरही पतीनं त्याच्या गर्लफ्रेंडला सोडलं नाही. गेल्या चार वर्षांपासून तिच्याच इशाऱ्यावर तो नाचतो आहे, अशी तक्रार घेऊन एक पत्नी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि पतीविरोधात आक्रोश सुरू केला. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे. 

रेखा बेन नावाच्या एक महिलेनं आग्रा येथील पोलीस ठाण्यात पती विनोद विरोधात तक्रार दाखल केली आहे. रेखा बेननं तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, तिचा विवाह विनोद याच्यासोबत २० फेब्रुवारी २०१८ मध्ये झाला. लग्नात तिच्या कुटुंबीयांनी नवरदेवाच्या कुटुंबीयांनी जितकं मागितलं तितकं सगळं दिलं. पण लग्नानंतरही आपला छळ सुरूच होता, असं रेखा हिचं म्हणणं आहे. पती विनोदचे विवाहबाह्य संबंध असून तो आपल्यापासून दूर राहतो. तसंच सासरची मंडळी अजूनही ५ लाख रुपयांचा हुंडा मागून मानसिक छळ करत असल्याची तक्रार रेखा हिनं दिली आहे. 

पती जवळ घेईनारेखानं आपल्या तक्रारीत म्हटलंय की लग्नाला चार वर्ष उलटून गेली पण पती विनोद अजूनही आपल्याला जवळ घेत नाही. तसंच कुठं फिरायला देखील घेऊन गेलेला नाही. लग्नापासूनच आपल्यापासून तो दूर राहायला लागला ते आजही कायम आहे. विनोद त्याच्या गर्लफ्रेंडच्या इशाऱ्यावर चालतो आणि माझ्याशी बोलत देखील नाही. गर्लफ्रेंड नाराज होणार नाही  ना याची भीती त्याला आहे. त्यामुळे माझ्यासोबत शारीरीक संबंध देखील ठेवले नाहीत, असं पत्नीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. इतकंच काय तर गर्लफ्रेंड नाराज झाली तर पती काही दिवस जेवत नाही, हेही तिनं पोलिसांना सांगितलं आहे. 

पोलिसांकडून गुन्ह्याची नोंदसासरच्या मंडळींकडून पाच लाख रुपये हुंडा मागितला जात असून त्यासाठी मानसिक आणि शारीरीक छळ केला जात असल्याचाही आरोप रेखा बेन यांनी केला आहे. याची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली आहे. तसंच रेखा यांनी सासरच्या मंडळींकडून आपल्या जीवाला धोका असल्याचीही तक्रार दिली आहे. 

रेखाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिचा पती विनोद, भाऊ, सासऱ्यांचा भाऊ, पतीची गर्लफ्रेंड, सासू माली बेन आणि नणंद दिविया यांच्या विरोधात आयपीसी कलम ४९८अ, ३२३, ५०४, ५०६ आणि गुंडा अधिनियमच्या कलमाअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यानुसार कारवाई केली जाई, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी