शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला गस्तीवरील पोलिसांनी दिले जीवनदान; आत्महत्येसाठी तलावात उडी मारणाऱ्या तिला अडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 14:51 IST

Attempt to Suicide : सदर महिलेस शहर पोलीस ठाण्यात आणून तीला समज देण्याचे काम सध्या सुरू आहे. 

ठळक मुद्देलक्ष्मी व्यंकटराजन अनडम ( वय ३७ , रा. पद्मानागर ) असे आत्महत्या करण्यापासून रोखलेल्या महिलेचे नाव आहे.

नितिन पंडीतभिवंडी - शहरातील वऱ्हाळादेवी तलावात उडी मारून आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांच्या सतर्कतेने जीवनदान मिळाले आहे. महिलेला आत्महतेपासून रोखून तिचे प्राण वाचविलेल्या या दोन्ही पोलिसांचा पोलीस अधिकाऱ्यांसह शहरवासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. तर सदर महिलेस शहर पोलीस ठाण्यात आणून तीला समज देण्याचे काम सध्या सुरू आहे.               

लक्ष्मी व्यंकटराजन अनडम ( वय ३७ , रा. पद्मानागर ) असे आत्महत्या करण्यापासून रोखलेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला पती व मुलांसह पद्मानागर येथील बाबू शेठ चाळ येथे राहत असून घरात पती व मुलांच्या त्रासाला कंटाळून ती रविवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान शहरातील वऱ्हाळादेवी तलावात उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. याच वेळी या परिसरात गस्ती वर असलेल्या शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई राहुल पवार व संजय कोळी यांनी सदर महिलेस पाण्यात उडी मारण्यापूर्वीच अडवले व तिला आत्महत्या करण्यापासून रोखले. सदर महिलेस शहर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता पती व मुलांच्या सततच्या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती महिलेने पोलोसांना दिली असून महिलेच्या पतीने दुसरे विवाह केले असल्याची शंका देखील माहिलेने पोलीसांसमोर व्यक्त केली असून या  महिलेची समज पोलिसांनी काढली असून घरातील व्यक्तींना देखील समज देण्याचे आश्वासन महिलेला देण्यात आले आहे.                  

विशेष म्हणजे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई राहूल पवार व संजय कोळी यांचे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोवरच शहरवासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. तर आम्ही आमचे कर्तव्य बजावले असून एका महिलेचा जीव जाण्यापासून वाचविले असल्याने समाधान वाटत आहे अशी प्रतिक्रिया पोलीस शिपाई राहुल पवार यांनी दिली आहे.

टॅग्स :Policeपोलिसbhiwandiभिवंडी