शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगेटवरील महिला गेट कीपरचा विनयभंग :  आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:23 IST

रात्रीची वेळ होती. सिंदी रेल्वेगेटवर एक महिला गेट कीपर कर्तव्यावर हजर होती. अचानक एक आरोपी रेल्वे गेटवर आला. त्याने या महिला कर्मचाऱ्याला एकटी पाहून तिचा विनयभंग केला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळाला.

ठळक मुद्देअंधाराचा फायदा घेऊन कृत्य

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रात्रीची वेळ होती. सिंदी रेल्वेगेटवर एक महिला गेट कीपर कर्तव्यावर हजर होती. अचानक एक आरोपी रेल्वे गेटवर आला. त्याने या महिला कर्मचाऱ्याला एकटी पाहून तिचा विनयभंग केला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळाला. या घटनेमुळे रेल्वेत खळबळ उडाली असून महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.सीमा (बदललेले नाव) असे या महिला गेट कीपरचे नाव आहे. त्या नागपूर येथे राहत असून नागपूर विभागातील सिंदी रेल्वे गेट क्रमांक १०३ येथे ड्यूटीवर आहेत. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे त्या कर्तव्यावर गेल्या. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला. काही कळायच्यात आत त्याने या महिला कर्मचाऱ्याला पकडून तिचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केल्यामुळे काही अंतरावर असलेल्या रेल्वे क्वॉर्टरमधील नागरिक मदतीसाठी धावले. परंतु तोपर्यंत अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळून गेला होता. घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर रेल्वेस्थानक आहे. भयभीत झालेल्या या महिलेने आरपीएफला घटनेची माहिती दिली. त्यांनी स्थानिक पोलिसांना मदत मागितली. परंतु पोलिसांनी हे प्रकरण आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी उशिरा या महिलेने नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. लोहमार्ग पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची दखल घेत अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३५४ (बी) नुसार गुन्हा दाखल केला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महिलांना रात्री ड्यूटीवर थांबविता येत नाही. परंतु गेट कीपरसारखी जबाबदारी महिलेस देणे आणि रात्री कर्तव्यावर ठेवणे याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंगrailwayरेल्वे