शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कॅन्सर झाल्याचं खोटं सांगून महिलेने जमवले तब्बल 81 लाख; 7 वर्षांनी 'अशी' झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 17:29 IST

Amanda Christine Riley : अमेरिकेतील एका महिलेने खोटं बोलून पब्लिक डोनेशनमधून पैसे मिळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कॅन्सरसारखा (Cancer) गंभीर आजार कधी स्वप्नातही कोणाला होऊ नये. कॅन्सरच्या उपचारांसाठी खूप मोठा खर्च येतो. कॅन्सरसाठी लागणारा खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे लोक पब्लिक डोनेशनची मदत घेतात. पब्लिक डोनेशनमधून येणारा पैसा परत करावा लागत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची बरीच मदत होते. अमेरिकेतील एका महिलेने खोटं बोलून पब्लिक डोनेशनमधून पैसे मिळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमांडा क्रिस्टीन रिले (Amanda Christine Riley) नावाच्या महिलेने तिला कॅन्सर झाल्याचं खोटं सांगून लोकांकडून सात वर्षांपर्यंत डोनेशन मिळवलं. त्यानंतर जे सत्य समोर आले ते भयंकर आहे.

कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या अमांडा क्रिस्टीन रिले नावाच्या महिलेने तिला हॉजकिन्स लिम्फोमा (Hodgkin’s lymphoma) असल्याचं सांगितलं. 2012 मध्ये या 37 वर्षीय महिलेने स्वतःला कॅन्सर झाला असल्याचं सांगितलं. उपचाराच्या खर्चासाठी तिने ऑनलाईन डोनेशनही मागायला सुरुवात केली. याचदरम्यान लोकांनी त्या महिलेला सहानुभूती दाखवत तिला आर्थिक मदत केली. कॅलिफोर्नियातील सॅन जॉस इथं राहणार्‍या अमांडाने तिच्या खोट्या आजारपणाबद्दल लोकांना शंका येऊ नये म्हणून Lymphoma Can Suck It नावाचा ब्लॉग सुरू केला. 

केस गेलेले फोटो आणि कॅन्सर स्ट्रगलच्या कथा लोकांना सांगायची. त्यामुळे या महिलेला तिच्या संघर्षात मदत करण्यासाठी लोकांनी तिच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली. 7 वर्षात एकूण 105,513 डॉलर्स म्हणजेच तब्बल 81 लाख 20 हजार रुपयांहून अधिक रक्कम तिच्या खात्यात जमा झाली. ही महिला कॅन्सरबद्दल तिच्या कुटुंबीयांशीही खोटं बोलली होती. महिलेची ही फ्रॉड स्कीम इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिसने 2019 मध्ये शोधून काढली होती. त्यानंतर महिलेवर वायर फ्रॉडचा आरोप लावण्यात आला होता. 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिच्यावरील गुन्हा सिद्ध होऊन तिला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. तिला बनावट कॅन्सरच्या नावावर जमा केलेली सर्व रक्कम परत करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. तुरुंगातून सुटल्यानंतरही ती तीन वर्षे पोलिसांच्या देखरेखीखाली राहणार आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांनी तिच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले, त्यापैकी बहुतेक लोक तिचे कुटुंबीय, मित्र आणि चर्चमधील होते. याशिवाय काही निधी उभारणाऱ्यांमार्फतही तिला पैसे मिळाले होते. अशाप्रकारे तब्बल सात वर्ष ही महिला फ्रॉड करत राहिली आणि पैसे मिळवत राहिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :cancerकर्करोगCrime Newsगुन्हेगारी