शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह विहिरीत तरंगताना आढळल्याने खळबळ, महिलेची चिमुकल्या मुलासह आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 19:38 IST

Suicide : गणेशपूर येथील घटना : कारण अस्पष्ट, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

ठळक मुद्देदुपारी १ वाजताच्या सुमारास कंचना शेषराव लोखंडे (२६, रा. गणेशपूर) व तिचा चिमुकला नवीनकुमार (१ वर्षे) याचा मृतदेह शिवारातील विहिरीत तरंगताना आढळल्याने छोट्याशा गावात खळबळ उडाली.

मोर्शी (अमरावती) : एका २६ वर्षीय विवाहितेने तिच्या एक वर्षे वयाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृद्यद्रावक घटना तालुक्यातील गणेशपूर येथे सोमवारी दुपारी उघड झाली. दुपारी १ वाजताच्या सुमारास कंचना शेषराव लोखंडे (२६, रा. गणेशपूर) व तिचा चिमुकला नवीनकुमार (१ वर्षे) याचा मृतदेह शिवारातील विहिरीत तरंगताना आढळल्याने छोट्याशा गावात खळबळ उडाली.             

मोर्शी शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशपुर येथे गावाला लागून जयदेव लोखंडे यांचे शेत आहे. ते मुलगा, सून व नातवांसह त्या शेतातच घर बांधून राहतात. स्वत:ची शेती व मोलमजुरी करून लोखंडे कुटूंब गुजराण करतात. सोमवारी दुपारी जयदेव लोखंडे, मुलगा शेषराव व अन्य सदस्य शेतातील घरात असताना त्यांना कंचना ही मुलासह शेतातील विहिरीजवळ उभी दिसली. मात्र घरातील सर्वच जण विहिरीजवळ नेहमीच जात असल्याने कुणालाही शंका आली नाही. दरम्यान तिने मुलासह विहिरीत उडी घेताच कुटूंबिय विहिरीकडे धावले. मात्र ते दोघेही मायलेक विहिरीत नाहीसे झाले होते. आरडाओरड झाल्यानंतर गावातील गणेश मरकाम याने विहिरीत उडी घेतली. मात्र त्यांचा शोध लागू शकला नाही. तातडीने या घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत ग्रामस्थांच्या मदतीने मायलेकांचे मृतदेह विहिरीबाहेर काढले. पंचनाम्यानंतर उत्तरिय तपासणीसाठी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मोठा मुलगा पाच वर्षांचाकंचना हिचे पाच वर्षाआधी शेषराव लोखंडे यांचेसोबत लग्न झाले. त्यांना पाच वर्षे व एक वर्षे वयाची दोन मुले होती. पैकी एक वर्षाच्या मुलाला घेऊन कंचना हिने आत्मघात केला. वृत्त लिहिस्तोवर आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. यापुर्वीही कंचना हिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांकडून त्या माहितीस दुजोरा मिळू शकला नाही. 

गणेशपूर शिवारातील एका विहिरीतून महिला व तिच्या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत्युचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. त्यावरच गुन्ह्याचे स्वरूप अवलंबून असेल. - संजय सोळंके, ठाणेदार, मोर्शी

टॅग्स :Suicideआत्महत्याAmravatiअमरावतीPoliceपोलिस