उल्हासनगर - कॅम्प नं-३ परिसरात शुक्रवारी दुपारी अड्डीच वाजता ४० वर्षीय महिलेला बाळासाहेब पहारे याने रस्त्यात अडवून लग्नाची मागणी घातली. लग्नाला नकार देताच महिलेवर विळ्या ने हल्ला केला असून महिला रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.उल्हासनगर कॅम्प नं-३ चोपडा कोर्ट परिसरात सदर महिला कुटुंबासह राहते. शुक्रवारी दुपारी अड्डीच वाजता डॉ आंबेडकर चौकातून स्मशाभूमी रस्ता मार्ग जात होत्या. त्यावेळी ओळखीच्या बाळासाहेब पगारे यांनी या महिलेला रस्त्यात अडवून माझ्या सोबत लग्न कर. नाहीतर मारेल. अशी धमकी दिली. अलकाने लग्नास नकार देताच संतापलेल्या बाळासाहेब याने लपविलेला गवत कापण्याच्या विळयाने डोक्यावर, छातीवर, पाठीवर वार करून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर मध्यवर्ती रूग्णालयात उपचार सुरू असून मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी बाळासाहेब पगारे याचा शोध घेत आहे.
लग्नास नकार दिल्याने महिलेवर विळ्याने हल्ला, महिलेची मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 16:52 IST