शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह मॅरेजनंतर काही मिनिटांतच पत्नीची कुऱ्हाडीनं हत्या; पतीनं स्वत:लाही संपवलं, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 16:08 IST

लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पतीनं पत्नीची हत्या केली आणि स्वत:ही आत्महत्या करत आयुष्य संपवलं. त्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 

कोलार - कर्नाटकच्या कोलार इथं हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी लव्ह मॅरेजनंतर काही तासांतच युवकाने त्याच्या पत्नीची कुऱ्हाडीनं हत्या केली आहे. त्यानंतर त्याच कुऱ्हाडीनं स्वत:वर वार करून आत्महत्या केली आहे. या घटनेत युवकाचाही मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सध्या या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलार जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या नवीन कुमार आणि लिखिता श्री यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ७ ऑगस्टला दोघांचे धूमधडाक्यात लग्न झालं, ज्यात दोघांचे मित्र आणि कुटुंबातील लोक सहभागी होते. लग्नानंतर दोघांनी कुटुंबासोबत काही वेळ घालवला. त्यानंतर दोघं एका नातेवाईकाच्या घरी चहा पिण्यासाठी गेले. यावेळी नवीन आणि लिखिता यांच्यात काही कारणास्तव वाद झाला. दोघांमधील भांडण इतकं वाढलं की हाणामारी झाली. 

या झटापटीत नवीननं लिखितावर धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर त्याच शस्त्राने स्वत:वरही हल्ला केला. याचवेळी नातेवाईक तिथे पोहचले आणि घरचा दरवाजा तोडला तेव्हा दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. या दोघांनी घाईघाईनं हॉस्पिटलला आणलं मात्र त्याठिकाणी लिखिताला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तोपर्यंत नवीन जिवंत होता मात्र तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला उपचारासाठी नेले. गुरुवारी सकाळी नवीनचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, नवीन आणि लिखिता यांना सासरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे घरी नेले होते. तिथे दोघांनी चहा घेतला त्यानंतर नवीन आणि लिखिता एका खोलीत गेले आणि आतून दरवाजा बंद केला. काही मिनिटांत खोलीतून एकमेकांवर जोरजोरात ओरडत असल्याचा आवाज आला. त्यामुळे नातेवाईक धावत त्या खोलीकडे गेले तेव्हा खिडकीतून पाहताच नवीन लिखितावर हल्ला करत असताना दिसला. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो तुटला नाही. मात्र काही वेळाने दरवाजा तुटला तोपर्यंत लिखिता आणि नवीन दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. नवीन हा कपड्याच्या दुकानाचा मालक होता तर लिखिता ही प्री यूनिवर्सिटीत शिक्षण पूर्ण करत होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी