शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पर्दाफाश! रेल्वे पोलिसांच्या मदतीनं साडे चार किलो सोन्यावर मारला होता डल्ला, नोकरासह दोन पोलिसांना अटक

By मनीषा म्हात्रे | Updated: December 12, 2022 18:43 IST

ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मँगलोर येथील सोन्याचे व्यापारी असून त्यांनी पाटीलकडे विश्वासाने झवेरी बाजार येथे पोहविण्यासाठी ४.५ किलोग्रॅम सोने दिले होते. पण...

मुंबई : रेल्वे पोलिसांच्या मदतीने नोकरानेच मालकाच्या अडीच कोटी रुपयांच्या साडे चार किलो सोन्यावर हात साफ केल्याचे ट्रॉम्बे पोलिसांच्या चौकशीतून उघडकीस आले आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी नोकर नितीन भुजिंग पाटील (२८) याच्यासह ठाणे रेल्वे पोलीस प्रभाकर युवराज नाटेकर (२९) आणि विकास भिमा पवार (२८) या त्रिकूटाला अटक केली आहे.

ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मँगलोर येथील सोन्याचे व्यापारी असून त्यांनी पाटीलकडे विश्वासाने झवेरी बाजार येथे पोहविण्यासाठी ४.५ किलोग्रॅम सोने दिले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे पाटील झवेरी बाजारात न पोहचल्याने त्यांना संशय आला. त्यांनी मुंबईत धाव घेतली. यानंतर, पाटीलने अन्य क्रमांकावरून संपर्क साधत त्याच्याकडील सोन्याची चोरी झाल्याचे सांगितले. त्यावरून तक्रारदार यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठून तक्रार दीली.

परिमंडळ ६ चे पोलीस उप आयुक्त  हेमराजसिंह राजपूत, ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र रणशेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास सुरू झाला. अखेर, नोकराच्या जबाबात तफावत आढळून आल्याने त्यांनी त्याच्याकडेच उलटतपासणी सुरू केली. अखेर, त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत पोलीस मित्राच्या मदतीने त्यानेच हा कट आखल्याचे समोर आले.

असा रचला डाव -नितिन पाटील हा गेल्या सहा वर्षांपासून तक्रारदार व्यापाऱ्याकडे कामाला आहे. तसेच मालकाकडे खूप पैसे असून साडे चार किलो सोन्याने काही फरक पडणार नाही असे समजून त्याने चोरीचा डाव आखला. यामध्ये ठाणे रेल्वे पोलीस दलात असलेल्या मित्रांची मदत घेतली. त्यांचीही कोट्यवधीचे सोने पाहून नियत फिरली. त्यानंतर, सोने नाटेकरकडे देत तो जुईनगर स्थानकातील पोलिसांकडे गेला. आणि चोरी झाल्याचे सांगून तेथून मालकाला कॉल करून सांगितले. मात्र, मालक मुंबई पोलिसांकडे गेला आणि अवघ्या काही तासातच आरोपीचे बिंग फुटले.

पोलिसाच्या गावच्या घरातून दागिने हस्तगतनाटेकरने त्याच्या गावच्या घरात दागिने लपवून ठेवले होते. पोलिसांनी सर्व दागिने हस्तगत केले आहे. दागिने मिळाल्यामुळे व्यापाऱ्याने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस