शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

चार सायाळची शिकार: एकाला अटक, तिघे पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 19:30 IST

सायाळची शिकार करून घरात लपवून ठेवणाऱ्या  तिवसा तालुक्यातील एका आरोपीला वनविभागाने अटक केली. तीन आरोपी पसार झाले आहेत.

अमरावती - सायाळची शिकार करून घरात लपवून ठेवणाऱ्या  तिवसा तालुक्यातील एका आरोपीला वनविभागाने अटक केली. तीन आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या घरातून मृतावस्थेतील चार सायाळ जप्त केल्या. त्यांची शिकार चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील माळेगाव वनवर्तुळात करण्यात आली होती. विलास किसन राठोड (रा. भिवापूर, ता. तिवसा) असे अटक आरोपीचे, तर मंगल जाधव, दिनेश चव्हाण, गोकुल चव्हाण (तिन्ही रा. भिवापूर) अशी पसार आरोपींची नावे आहेत. विलासने सायाळची शिकार करून घरात लपवून ठेवल्याची माहिती वनविभागाला गुरुवारी मिळाली होती.  त्या आधारे उपवनसरंक्षक गजेंद्र नरवणे, सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे,  चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनातील पथकाने विलास राठोडच्या घरावर धाड टाकली. त्याच्या घरातून चार मृत सायाळ जप्त केल्या. चारही सायाळ भाजलेल्या अवस्थेत होत्या. शिकारी त्या सायाळ फस्त करण्याच्या बेतात होते. वनविभागाने आरोपी विलास राठोड याला तात्काळ अटक केली. त्याच्या चौकशीत आणखी तीन आरोपी  पुढे आले असून, पसार मंगल, दिनेश व गोकुल यांचा शोध वनविभाग घेत आहे. वनविभागाने आरोपीविरुद्ध वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ४९, ४८ (अ), ५१ नुसार गुन्हा नोंदविला. आरोपी विलासला शुक्रवारी तिवसा न्यायालयातील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने तीन दिवसाची वनकोठडी ठोठावली आहे. 

सायाळ शेड्यूल ४ चा वन्यप्राणीसायाळ शेड्यूल ४ चा वन्यप्राणी आहे. कीटक हे त्याचे भक्ष्य आहे. जमीन भुसभुशीत करून त्यात राहत असल्याने पाणी जिरण्यास या प्राण्याकरवी मोठी मदत मिळते. या वन्यप्राण्याच्या शिकारीबद्दल तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद वनकायद्यात आहे. 

या पथकाने केली कारवाई सायाळ शिकाऱ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्यामध्ये वर्तुळ अधिकारी संतोष धापड, वनपरिक्षेत्र अधिकारी  पी.एन. तिडके, वनरक्षक प्रीती तिवारी, कल्याणी रेखे, एस.डब्ल्यू. थोटे, धनराज गवई यांच्यासह अमरावती येथून कार्स संस्थेचे वन्यजीवप्रेमी चेतन भारती आणि विज्जू खोट्टे यांना पंच म्हणून यांचा सहभाग होता. तसेच जसवंत, डोंगरे, विधळे, कथलकर, हिवराळे, चव्हाण, भुगुल यांनी पथकाला सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती