शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून, कर्जत तालुक्यातील घटना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 05:42 IST

दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे घडली. पत्नीवर धारदार कोयत्याने वार करून पतीने जंगलात पलायन केले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नेरळ  - दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे घडली. पत्नीवर धारदार कोयत्याने वार करून पतीने जंगलात पलायन केले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.ताडवाडी येथील लक्ष्मण दरवडा यांच्या बहिणीचे कळंबजवळील फोंडेवाडी येथील योगेश भला याच्यासोबत आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र योगेश बेरोजगार असल्याने नवरा-बायकोमध्ये सतत भांडणे होत. परिणामी योगेशची पत्नी भीमा दोन्ही मुलांना घेऊन चार महिन्यांपूर्वी आपल्या भावाकडे माहेरी ताडवाडी येथे राहण्यास गेल्या. त्यानंतर योगेशनेही सासरीच आपले बस्तान मांडले.भीमा मोलमजुरी करून घर चालवायच्या, तर योगेश पत्नीला मारहाण करून दारुसाठी पैसे मागायचाया. रविवारी ५ मे रोजी ताडवाडी येथील घरी भीमा घरी एकट्याच असताना त्याचा फायदा घेऊन योगेशने पत्नीकडे दारूसाठी पैसे मागितले. त्या दोन दिवसांपासून कामावर गेल्या नसल्याने त्यांच्याकडे पैसे नव्हते. परिणामी त्यांच्यात वाद सुरू झाला. त्याच रागात योगेश याने भीमा यांच्या डोक्यात धारदार कोयत्याने वार केले आणि बोरगावच्या जंगलात पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भीमा यांचा काही वेळाने त्याच ठिकाणी झोपडीत मृत्यू झाला. या घटनेनंतर नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.दोन पथकांकडून शोध सुरूपोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आणि सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी यांनी जंगलात पळून गेलेल्या योगेशचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली आहेत. पोलीस उपनिरीक्षक सचिन सांगळे हे ताडवाडी येथे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी