शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

पतीचा खून करून मिसिंग तक्रार देणाऱ्या पत्नीस प्रियकरासह अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 18:52 IST

बोईसर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

ठळक मुद्देअनिल कुमार रावत (32) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ममता रावत आणि सोनू (22) अशी आरोपींची नावे आहेत.अनैतिक संबंधास पतीचा अडथळा येत असल्याने दोघांनीही त्याच्या हत्येचा कट रचला.

पालघर  - बोईसर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून पतीची हत्या केली आणि बनाव रचत मिसिंगची तक्रार दाखल केली होती.  अनिल कुमार रावत (32) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ममता रावत आणि सोनू (22) अशी आरोपींची नावे आहेत. बोईसर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल कुमार रावत हा पालघर येथील एका कंपनीत सुपरवायझरचे काम करत होता. अनिलची पत्नी ममता हिने 15 फेब्रुवारीला तो दोन दिवसांपासून घरी आला असल्याची तक्रार बोईसर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. दरम्यान, बोईसर येथील जंगलामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह पोलिसांना सापडला. मृतदेहाची अवस्था खराब असल्याने तो नक्की कोणाचा याचा शोध घेणे अवघड होते. परंतु काही दिवसांपूर्वी अनिलच्या पत्नीने तो हरवला असल्याची तक्रार दिली असल्याने पोलिसांनी तिला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावले. यावेळी ममताने हा आपला पतीच असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल केला.

हत्येप्रकरणी पोलिसांना अनिलची पत्नी ममता हिच्यावर दाट संशय होता. तसेच गेल्या काही महिन्यांपासून अनिलच्या घरी राहण्यासाठी आलेल्या सोनू याच्यावरही पोलिसांना संशय होता. सोनू हा अनिलचा लांबचा नातेवाईक असल्याने तो तीन महिन्यांपासून त्यांच्या घरी राहण्यास आला होता. याच दरम्यान ममता आणि त्याच्यामध्ये जवळीकता आली होती. अनैतिक संबंधास पतीचा अडथळा येत असल्याने दोघांनीही त्याच्या हत्येचा कट रचला.

टॅग्स :MurderखूनMissingबेपत्ता होणंPoliceपोलिसArrestअटक