शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तेसाठी १० दिवस डांबले घरात, पत्नी, मुलगा, पुतण्या, भाचा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 01:10 IST

Crime News : वडिलोपार्जित मालमत्ता नावावर करण्यासाठी सुरेश पावशे याला मारहाण करत घरातील मंडळींनीच १० दिवस घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे.

कल्याण : वडिलोपार्जित मालमत्ता नावावर करण्यासाठी सुरेश पावशे याला मारहाण करत घरातील मंडळींनीच १० दिवस घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी पावशे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांची पत्नी दूर्वा, मुलगा निखिल, पुतण्या स्वप्निल आणि भाचा पुष्कर सुतार अशा चौघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.कल्याण पूर्वेतील हनुमाननगर परिसरात हा प्रकार घडला आहे. पावशे हे रिक्षाचालक आहेत. त्यांच्या नावावर काही वडिलोपार्जित मालमत्ता आहे. ही मालमत्ता आमच्या नावावर करा, अशी मागणी पत्नी आणि मुलगा अनेक दिवसांपासून त्यांच्याकडे करत होते. त्यावर पावशे त्यांची वारंवार समजूत काढत त्यांची मागणी टाळत होते. अखेर दूर्वा, निखिल, स्वप्निल आणि पुष्कर यांनी त्यांना मारहाण करत घरातील एका खोलीत दहा दिवस डांबून ठेवले. मात्र, तेथून कशीबशी त्यांनी त्यांची सुटका करून घेत थेट कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. 

निखिलची पोलीस कोठडी वाढवलीपोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत दूर्वा, निखिल, पुतण्या स्वप्निल, पुष्कर या चौघांना अटक केली. सर्व आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, सोमवारी कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले गेले. यात मुलगा निखिल याची पोलीस कोठडी एक दिवसाने वाढविण्यात आली, तर उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण