शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! पत्नी म्हणाली, "शेजाऱ्याने माझी साडी चोरली"; संतापलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 11:36 IST

हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील नथुपूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.

हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील नथुपूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीची साडी चोरल्याचा आरोप करत एका व्यक्तीने शेजाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, आरोपी अजयची पत्नी रीना हिने तिच्या पतीला सांगितलं की त्यांचा शेजारी पिंटूने तिची साडी चोरली आहे. 30 वर्षीय पिंटू गुरुग्राममध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास पिंटू ड्युटीवरून परतला तेव्हा अजय त्याच्याशी बोलला, मात्र पिंटूने चोरीचा आरोप फेटाळून लावला, त्यानंतर दोघांमध्ये खूप वाद सुरू झाला. पोलिसांनी सांगितले की, पिंटू मूळचा बिहारचा आणि अजय (42) उत्तर प्रदेशचा आहे. नाथुपूर गावात एकाच घरात भाड्याने वेगळ्या खोलीत राहत होते.

पिंटूचा रूममेट आणि घटनेचा प्रत्यक्षदर्शी अशोक कुमार याने पोलिसांना सांगितले की, भांडणाच्या वेळी अजयने त्याच्या खोलीतून बंदूक काढून पिंटूच्या पोटात गोळी झाडली. अशोकने तक्रारीत म्हटले आहे की, 'आम्ही त्याची बंदूक हिसकावून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने पुन्हा बंदूक हिसकावून पिंटूवर गोळी झाडली. आम्ही पिंटूला जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अजयच्या विरोधात मंगळवारी रात्री डीएलएफ फेज-3 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आरोपी सुरक्षा रक्षकाने त्याच्या परवाना असलेल्या बंदुकीने दुसऱ्या सुरक्षा रक्षकावर गोळी झाडली. त्याची बंदूक जप्त करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल असं सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी