शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बायको परपुरुषासोबत पळून गेली; चिडलेला नवरा महिलांशी शारीरिक संबंध ठेवून करत असे हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 21:13 IST

Murder And serial Killer : या आरोपीविरोधात मूलगुणच्या बालगुमध्ये ३५ वर्षीय महिलेची हत्या केल्याचाही आरोप आहे. तिचा मृतदेह १० डिसेंबरला सिद्दीपेट येथे आढळून आला होता.

ठळक मुद्दे आरोपी रामुलू याचे वयाच्या २१व्या वर्षी लग्न झाले होते. त्याची पत्नी परपुरुषासोबत पळून गेली होती.

तेलंगणातील हैदराबादमध्ये पोलिसांनी सिरीयल किलरला अटक केली आहे. हा सिरीयल किलर अनेक महिलांशी शारिरीक संबंध ठेवल्यानंतर तो त्यांची हत्या करायचा. या आरोपीने आजतागायत १८ महिलांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दोन महिलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर या सिरीयल किलरने आणखी १६ महिलांची हत्या केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे.पोलिसांनी आरोपीची केलेल्या चौकशीदरम्यान त्याने १८ हत्येची कबुली पोलिसांना दिली. आरोपीची बायको परपुरुषासोबत पळून गेली होती. तोच राग आणि चीड मनात त्याने ठेवली होती. त्यानंतर त्याने अनेक महिलांशी शारीरिक संबंध ठेऊन त्यांची हत्या केली. ३० डिसेंबर २०२० रोजी घाटकेसर येथील अंकुशपुरमध्ये वेंकटगिरी येथील ५० वर्षीय महिलेची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात बोरबंडा येथील ४५ वर्षीय रामुलू याला बेड्या ठोकल्या. या आरोपीविरोधात मूलगुणच्या बालगुमध्ये ३५ वर्षीय महिलेची हत्या केल्याचाही आरोप आहे. तिचा मृतदेह १० डिसेंबरला सिद्दीपेट येथे आढळून आला होता.

आरोपी रामुलू याचे वयाच्या २१व्या वर्षी लग्न झाले होते. त्याची पत्नी परपुरुषासोबत पळून गेली होती. त्यानंतर त्याच्या मनात महिलांबद्दल चीड निर्माण झाली. २००३ पासून त्याने महिलांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. शारिरीक संबंधांसाठी तो महिलांना पैसे देऊन बोलवत असे. शारीरिक संबंध प्रस्थापित झाले की  त्यानंतर त्यांची हत्या करत असे. आतापर्यंत आरोपी रामुलू याने १८ महिलांना टार्गेट करून हत्या केली असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकTelanganaतेलंगणाWomenमहिला