शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचं शेजाऱ्यावर जडलं प्रेम, पतीनं विरोध केला म्हणून पत्नीनं उचललं धक्कादायक पाऊल; पाहून सर्वच चक्रावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 17:30 IST

बिहारच्या मुझफ्फरपुरमध्ये थरारक घटना घडली आहे. पत्नीनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

मुझफ्फरपूर-

बिहारच्या मुझफ्फरपुरमध्ये थरारक घटना घडली आहे. पत्नीनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कुढनी ठाणे हद्दीतील अख्तियापूर परिया गावात घडली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार परिया गावातील रहिवासी संजय झा याचं लग्न जुली देवी हिच्यासोबत झालं होतं. लग्नानंतरचे काही दिवस सारंकाही आलबेल होतं. पण यातच जुली देवी हिचं गावातील एका तरुणावर प्रेम जडलं आणि दोघं एकमेकांना गुपचूप भेटू लागले. एकेदिवशी पती संजय झा याला पत्नीच्या या प्रकरणाबद्दलची माहिती मिळाली आणि त्यानं स्पष्ट शब्दांत पत्नीला बजावलं. तसंच सारंकाही थांबवण्यास सांगितलं. पतीकडून वारंवार विरोध होत असूनही पत्नीनं काही माघार घेतली नाही. तिनं प्रियकराला भेटणं सुरूच ठेवलं. यामुळे दाम्पत्यामध्ये दररोज भांडणं होऊ लागली. याच भांडणाचं रुपांतर एकमेकांविरोधातील द्वेषात झालं आणि पत्नीनं थेट स्वत:च्याच पतीला जीवे मारण्याचा कट रचला. 

हत्येचा कट रचलाजुली देवीचा पती संजय झा घराच्या दरवाजाजवळ एकटाच झोपायचा. याचाच फायदा उचलत सोमवारी रात्री पत्नीनं प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर दोघांनी मिळून पती संजय झा याचा खून करण्याचा ठरवलं. दरवाजाच्या जवळच झोपलेल्या संजय झा याचा चाकूनं गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर दोघंही आपापल्या घरी गेले. जेव्हा सकाळी गावकऱ्यांनी दरवाजाच्या बाहेरच संजय झा याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं आणि धक्काच बसला. गावकऱ्यांनी तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस ठाण्याचे अधिक्षक अरविंद पासवान घटनास्थळी पोहोचले आणि गावकऱ्यांची समजून घालून मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. 

पोलीस अधिकारी अरविंद पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार परिया गावातील रहिवासी संजय झा यांची हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात असून तपासणीनंतरच पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी