शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'मी शॉकमध्ये आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही' म्हणताच फसली पत्नी, उघड झालं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 11:17 IST

Delhi Crime News : चौकशी दरम्यान पोलिसांना मृतकाच्या पत्नीच्या जबाबात गडबड वाटली. त्यासोबतच पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती की, सुरेशच्या हत्येमागे त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर सचिन असू शकतात.

Delhi Crime News : पश्चिम दिल्लीच्या मंडावली भागात एका महिलेने प्रियकरासोबत मिळून  आपल्या पतीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, 4 डिसेंबरल एक सूचना मिळाली होती की, रेल्वे कॉलनीमध्य राहणाऱ्या सुरेश याला गंभीर स्थितीत एलबीएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ज्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर या केसची चौकशी सुरू झाली.

याबाबत पोलिसांनी जेव्हा मृत व्यक्तीच्या पत्नीचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला तर ती म्हणाली की, तिला या घटनेने फार धक्का बसला आहे, त्यामुळे पोलिसांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकणार नाही. मृतकाच्या परिवारातील वेगवेगळे सदस्य दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात राहत होते. सुरेशच्या मृत्यूच बातमी मिळताच सगळे त्याच्या घरी पोहोचले. पण कुणीच काही संशय व्यक्त केला नाही.

दिल्ली पोलिसांनी 7 डिसेंबर 2022 ला मृत सुरेशचं शवविच्छेदन केलं आणि मृतदेह कुटुंबियांना सोपवला. या दरम्यान पत्नी व मुलासहीत कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आलेत आणि कुणीही मृतकाच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला नाही. पण मृतकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसत होत्या. पीएम रिपोर्टमध्ये लिहिलं होतं की, सुरेशच्या डोक्याला, मानेला, छाती आणि पोटावर बाहेरून सोबत आतून जखमा आहेत.

सोबतच पीएम रिपोर्टमध्ये असंही लिहिलं होतं की, सुरेशचा मृत्यू श्वास गुदमरल्याने आणि मारहाण केल्याने झाला आहे. त्याच्या लिव्हरलाही इजा झाली होती. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली. हत्येचा सुगावा लागण्यासाठी पोलिसांनी एक टीम तयार केली. त्यांनी पत्नी, मुलगा आणि नातेवाईकांसोबतच शेजाऱ्यांची चौकशी केली. पण काहीच पुरावा सापडला नाही.

चौकशी दरम्यान पोलिसांना मृतकाच्या पत्नीच्या जबाबात गडबड वाटली. त्यासोबतच पोलिसांना गुप्त सूचना मिळाली होती की, सुरेशच्या हत्येमागे त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर सचिन असू शकतात.

पोलिसांनी आपली तपास पद्धत बदलली आणि कठोरपणे चौकशी केली. तेव्हा सुरेशची पत्नी हेमाने सगळं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर सचिन याला अटक केली. हेमाने पोलिसांना सांगितलं की, गेल्या दोन वर्षांपासून तिचे सचिनसोबत अनैतिक संबंध होते. दोघांना सोबत रहायचं होतं. त्यासाठी त्यांनी सुरेशची हत्या करण्याचा प्लान केला.

घटनेच्या दिवशी हेमा आणि सचिनने सुरेशला खूप दारू पाजली आणि काही वेळाने जेव्हा सुरेश नशेत टल्ली झाला तेव्हा दोघांनी पडदे आणि ओढणीने त्याचा गळा आवळला. तो बेशुद्ध पडेपर्यंत त्याच्या मानेवर आणि पोटावर लाथा मारल्या.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी