शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने विट, दगडाने ठेचून केली पतीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 16:39 IST

Crime News: विट, दगडाने ठेचून महिलेने केली घरधन्याची हत्या

धनज बु. : येथून जवळच असलेल्या व धनज पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या ग्राम हिंगणवाडी येथे एका महिलेने घरगुती वादातून स्वत:च्याच घरधन्याची (पती) विट व दगडाने ठेचून हत्या केली. ही ह्रदयद्रावक घटना १६ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.मृतकाची मुलगी शितल प्रविण धवणे (वाढोणा, सिद्धनाथपूर, जि. अमरावती) हिने धनज पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ती माहेरी हिंगणवाडी येथे दोन दिवसांपुर्वी आली होती. मृतक संतोष संभाजी कांबळे हे त्यांचे वडिल संभाजी कांबळे व आई रेखा कांबळे यांच्याशी घरकुलाच्या कारणावरून नेहमी वाद घालायचे. माझी आई सुनिता कांबळे हिलादेखिल मारहाण करायचे. असाच प्रकार १६ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडला. दारूच्या नशेत वडील संतोष कांबळे यांनी आजोबा संभाजी कांबळे यांच्याशी वाद घातला. आईने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी राग अनावर झाल्याने आई सुनीता हिने वडील संतोष कांबळे यांच्या डोक्यावर विट मारून गंभीर जखमी केले. तसेच गोट्याने डोक्याला ठेचले. गंभीर अवस्थेत त्यांना उपचाराकरिता नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी १६ जूनच्या रात्रीच आरोपी संगीता कांबळेला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कपील म्हस्के, बीट जमादार रामेश्वर रामचवरे, गजानन वानखेडे करित आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी