शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"पत्नीचं जिम ट्रेनरशी अफेअर नव्हतं, प्लॅनिंगने केली हत्या"; एकता हत्याकांडाबाबत पती म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 16:04 IST

एकता गुप्ता हत्या प्रकरणाचा खुलासा करताना आरोपी जिम ट्रेनर विमल सोनी याला अटक केली आहे.

कानपूर पोलिसांनी एकता गुप्ता हत्या प्रकरणाचा खुलासा करताना आरोपी जिम ट्रेनर विमल सोनी याला अटक केली आहे. तसेच ४ महिन्यांनंतर एकताचे मृतदेहही सापडला आहे. मात्र एकताचा पती राहुल गुप्ता यांचा अजूनही पोलिसांच्या तपासावर विश्वास नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, असं आवाहन राहुल यांनी मुख्यमंत्री योगी यांना केलं. पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे.

राहुल गुप्ता यांनी 'आज तक'शी बोलताना पोलिसांच्या कामावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच पत्नीचं प्रेमप्रकरण होतं हा अँगल नाकारला आहे. ते म्हणाले की, एखाद्या महिलेचं पुरुषासोबत संभाषण होत असेल तर त्याला अफेअर म्हणता येणार नाही. पोलिसांनी योग्य तपास केला असता, तर त्यांनी हत्येचा हेतू वस्तुस्थितीसह मांडला असता.

राहुल गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी सांगितलं की, विमलने स्वतः खड्डा खणून त्यात एकताचा मृतदेह पुरला पण एक माणूस तासाभरात पाच ते दहा फूट खड्डा कसा खणू शकतो या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलं नाही. अधिकारी वसाहतीतील कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की तेथे कोणी मदत करणारे होतं असा सवालही केला आहे.

एकता आणि जिम ट्रेनर विमल यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं, त्यावर राहुलने त्यात काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं. हे पूर्णपणे खोटं आहे. माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि आता तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जात आहे. स्वतःला वाचवण्यासाठी तिच्यावर आरोप केले जात आहेत. कारण, आता ती आपली बाजू मांडू शकत नाही.

राहुलच्या म्हणण्यानुसार, विमल त्याच्या पत्नीवर दबाव टाकत होता. अनेक दिवसांपासून तो हे हत्येचं प्लॅनिंग करत होता. कारण आधी प्लॅनिंग केल्याशिवाय अशी घटना घडू शकत नाही. जिम ट्रेनर विमलने प्रोटीन शेकमध्ये काहीतरी मिसळून ते एकताला दिल्याचा संशयही राहुलने व्यक्त केला आहे. विमल दोन वर्षांपासून जिम ट्रेनर होता, त्यामुळे साहजिकच तो एकताशी बोलायचा असंही सांगितलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी