शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पतीचं चॅटिंग पाहताच पत्नीच्या पायाखालची वाळू सरकली; नको ते सत्य उघडकीस आलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 22:11 IST

त्रासाला कंटाळून महिला पाेलिसाची तक्रार, पीडितेने तक्रारीत केले गंभीर आराेप

आशिष गावंडे

अकोला - पतीसह सासरकडील मंडळीकडून मानसिक व शारिरीक छळ हाेत असल्याचे नमुद करतानाच महिला पाेलिस कर्मचाऱ्याने तीचा पती समलैंगिक असल्याचा धक्कादायक आराेप तक्रारीत केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पतीसह सासरकडील पाच जणांविराेधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पाेलिसाने केलेल्या गंभीर आराेपांमुळे पाेलिस खात्यात खळबळ उडाली आहे.

जिल्हा पाेलिस दलात कार्यरत एका ३५ वर्षीय महिलेचे २०२२ मध्ये लग्न झाले. विवाहानंतर काही दिवस पतीसह सासरकडील मंडळींनी तीच्यासाेबत चांगला व्यवहार केला. ही बाब पाहून पत्नीच्या नात्याने या महिलेने सासरकडील घराच्या दुरुस्तीसाठी एक लाख व शेतीवरील दाेन लाख रुपयांचे कर्ज अदा केले. काही दिवसांतच पाेलिस विभागातील ड्यूटीच्या कारणावरुन व घरातील कामकाजाच्या मुद्यावरुन विवाहितेला मानसिक त्रास सुरु झाला. यात भरीस भर पतीनेही त्याचा खरा चेहरा उघड करीत पैशांसाठी लग्न केल्याचे त्याने पीडित विवाहितेला सांगितले. हे ऐकताच पीडितेला माेठा मानसिक धक्का बसला. इथपर्यंत न थांबता, कुटुंबियांकडून पीडितेच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला जाऊ लागला. या प्रकारामुळे मानसिकरित्या त्रस्त झालेली पीडिता आई, वडिलांसह शहरातील एका शासकीय निवासात राहू लागली. यानंतरही पती व सासरकडील सदस्यांकडून तीचा मानसिक छळ केला जाऊ लागला. यामुळे वैतागलेल्या पिडीतेने पाेलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. पाेलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन पतीसहीत पाच जणांविराेधात भारतीय न्याय संहितेच्या ३९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. 

असा झाला भंडाफाेड

एक दिवस आराेपी पतीने त्याचा मोबाइल चर्जिंगला लावला हाेता. त्यावेळी पीडितेने त्याचा माेबाइल तपासला असता, व्हाटसएपवरील मेसेज वाचून तीच्या पायाखालची जमिन सरकली. पतीचे काही इतर पुरुषांसाेबत नियमीत शारिरीक संबंध असल्याचे समाेर आले. पती घरी आल्यावर पीडितेने याविषयी जाब विचारला असता, सुरुवातीला पतीने काही बाेलण्यास टाळाटाळ केली. पंरतु पीडितेने व्हाटसअँप चॅट वाचून दाखवल्यावर पतीने लग्नापूर्वीपासूनच समलैंगिक असल्याची बाब कबुल केेली. पीडितेच्या तक्रारीत ही बाब नमुद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी