शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विरार हळहळले! पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 09:39 IST

Crime news: विरारच्या तरुण दाम्पत्याची शोकांतिका : अकस्मात मृत्यूची नोंद. काही दिवसांपूर्वी नवापूर येथे वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलीने आत्महत्या केली होती. त्याचप्रमाणे ही घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : विरारमध्ये राहणाऱ्या दाम्पत्यापैकी नवऱ्याचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्यानंतर घाबरलेल्या पत्नीने बुधवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

काही दिवसांपूर्वी नवापूर येथे वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलीने आत्महत्या केली होती. त्याचप्रमाणे ही घटना घडली आहे. मनवेलपाडा येथील दादूस क्लासिक या इमारतीमध्ये नरेंद्रसिंह परमार (२४) आणि त्याची पत्नी संतोष परमार (२२) हे दोघे भाड्याने राहत होते. त्यांचे अडीच वर्षांपूर्वी लग्न झाले होते व मूलबाळ नव्हते. काही दिवसांपूर्वी संतोषचा लहान भाऊ यांच्यासोबत राहण्यासाठी आला होता.

तिचा लहान भाऊ बुधवारी सकाळी कामावरून आल्यावर दरवाजा उघडा नसल्याचे त्याने पाहिले. दरवाजा उघडल्यावर बहिणीने गळफास घेतलेला मृतदेह तर भावजीचा मृतदेह त्याने पाहिल्यावर विरार पोलिसांना घटनेची माहिती दिली. विरार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

nनरेंद्रसिंहच्या पोटात मंगळवारी संध्याकाळी खूप दुखत असल्याने त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. रात्री ११च्या सुमारास तो घरी आला. परत पोटात दुखत असल्याने पत्नीने त्याला इनो दिले; पण काही उपयोग झाला नाही व त्याचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे पाहून पत्नी संतोष घाबरली आणि तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी