शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हायव्होल्टेज ड्रामा! पत्नीने दुसऱ्या महिलेसोबत पतीला रंगेहाथ पकडलं; धू-धू धुतलं, कॉलर पकडली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 11:27 IST

भररस्त्यात पती-पत्नीचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. महिलेने आपल्या पतीची रस्त्यावरच धुलाई केली.

पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून अनेकदा वाद होत असतात. काही वाद हे टोकाला जातात. विशेषत: हे नातं प्रेम आणि विश्वासावरच टिकून असतं. पण काही वेळी तिसरी व्यक्ती आयुष्यात आल्याने सर्वच बिघडतं. फसवणुकीमुळे नातंच संपतं. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. बिहारच्या दरभंगामध्ये भररस्त्यात पती-पत्नीचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. 

महिलेने आपल्या पतीची रस्त्यावरच धुलाई केली. चपलेने धू-धू धुतलं. हा प्रकार पाहून आसपासचे लोकही हैराण झाले. एवढंच नाही तर पतीची धुलाई केल्यानंतर महिला त्याची कॉलर पकडून त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेली. येथे तिने संपूर्ण प्रकार सांगितला. ही घटना दरभंगाच्या लहेरियासराय ठाण्याच्या परिसरातील आहे. यात एक महिला आपल्या पतीवर लक्ष ठेवत याठिकाणी पोहोचली. महिलेला अशी माहिती मिळाली होती, की तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत. इतकंच नाही तर त्याने गुपचूप दुसरं लग्नही केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच तिला राग अनावर झाला. तिने पतीला पकडून रस्त्यावरच मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेचा राग पाहून बचावासाठी तिच्या पतीने पळून जाण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. मारहाण करणाऱ्या महिलेनं सांगितलं की, तिचं 12 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, तिला तीन मुलं आहेत.

पतीने महिलेला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिलं होतं. यानंतर त्यानं दुसरं लग्नही केलं. याबाबत माहिती मिळताच महिला पतीच्या शोधात येथे पोहोचली होती. या महिलेने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे, मात्र पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचं महिलेचं म्हणणं आहे. दुसरीकडे, पहिल्या पत्नीसोबत राहत असतानाच पुन्हा दुसरं लग्न केल्याचं पतीनं मान्य केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी