शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:04 IST

ऋषी तीन भावांमध्ये सगळ्यात मोठा होता. त्याचे २ वर्षापूर्वी लग्न झाले होते. आई वडिलांचे आधीच निधन झाले होते. ऋषी ट्रकचालक होता.

अलीगड - गेल्या काही काळात पत्नीकडून पतीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यात उत्तर प्रदेशातील अलीगड येथेही हा प्रकार उघडकीस आला आहे. इथल्या ऋषी कुमार नावाच्या पतीची पत्नीने प्रियकरासोबत मिळून हत्या केली आहे. या हत्येतील आरोपी प्रियकर हा नात्याने ऋषीचा चुलत भाऊ होता. पोलिसांनी जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली.

१७ जूनच्या रात्री ही घटना घडली. सध्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून फरार प्रियकराचा शोध सुरू आहे. लग्नाच्या आधीपासून महिलेचे पतीच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. ३० वर्षीय ऋषी कुमार याची १७ जूनला गोळी मारून हत्या केली होती. त्याचा मृतदेह १८ जूनला घरापासूनच दूर अंतरावर सापडला. या युवकाच्या कानामागे गोळी लागली होती. ऋषीची पत्नी ललिता हिने पतीच्या हत्येनंतर बनाव रचला. गावातील एका व्यक्तीचा मोबाईल चोरीला गेला होता, त्याचा ऋषीवर आरोप लावला. त्यावरूनच त्या व्यक्तीने ऋषीची हत्या केली असावी असा संशय ललिताने पोलीस तक्रारीत व्यक्त केला.

तपासात समोर आलं सत्य

१९ जूनला पोस्टमोर्टमनंतर मृतदेह कुटुंबाला सोपवला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु तपासात पोलिसांना वेगळीच शंका आली. मृत ऋषीची पत्नी ललिता हिचे कुटुंबातील दीरासोबत प्रेमसंबंध होते. परंतु या दोघांनी लग्न केले नाही. ऋषीच्या लग्नानंतर या दोघांचे भेटणे सुरूच होते. त्याची भनक ऋषीला लागली. त्यानंतर ललिताने दीरासोबत मिळून पती ऋषीला कायमचे संपवण्याचा कट रचला. 

१० दिवसांपूर्वीच घरी आला होता

ऋषी तीन भावांमध्ये सगळ्यात मोठा होता. त्याचे २ वर्षापूर्वी लग्न झाले होते. आई वडिलांचे आधीच निधन झाले होते. ऋषी ट्रकचालक होता. हरियाणात तो ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. अलीकडेच काकाच्या मुलाच्या लग्नासाठी तो १० दिवसांपूर्वी गावी आला होता. पती बाहेर असताना पत्नी तिच्या माहेरी राहायची. अवैध संबंधातून ऋषीची हत्या झाली असावी असा संशय काही गावकऱ्यांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी तपास केला असता ऋषीच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले. त्यातूनच प्रियकराच्या मदतीने ऋषीची हत्या केल्याचे उघड झाले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी