शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:48 IST

आधारकार्डमध्ये दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने ती पतीसोबत बाजारात गेली आणि तिथून पतीला चकमा देऊन पसार झाली.

बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर अवघ्या १० दिवसांनी एक नवविवाहिता आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. आधारकार्डमध्ये दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने ती पतीसोबत बाजारात गेली आणि तिथून पतीला चकमा देऊन पसार झाली. ही महिला पळून जाताना आपल्यासोबत ८ लाख रुपयांचे दागिने आणि काही इतर मौल्यवान गोष्टी घेऊन गेल्याचे सांगितले जात आहे. ही घटना फुलवारिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

कोयला देवा टोला गावातील रहिवासी मंटू कुमार रजक यांनी आपली नवविवाहित पत्नी चुलबुली देवी हिच्या विरोधात फुलवारिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंटूने पोलिसांना सांगितले की, तो आपल्या पत्नी आणि बहिणीसोबत १५ जून रोजी आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी कुसौंधी बाजारात गेला होता. बाजारात गेल्यावर पत्नीने एक बहाणा केला आणि दोघांना एका दुकानात पाठवून स्वतः तेथून पसार झाली.

पती मंटूने सांगितले की, त्याने सुमारे ७-८ दिवस आपल्या पत्नीचा शोध घेतला. या काळात त्याला समजले की, चुलबुली देवीचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. त्याने मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुसौंधी गावातील रहिवासी आदित्य कुशवाहा याला या प्रकरणात आरोपी ठरवले आहे. मंटूचे म्हणणे आहे की, चुलबुली देवीने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला फसवून आपल्या प्रियकरासोबत पळ काढला आहे. मंटू आणि चुलबुली यांचे लग्न ५ जून रोजीच झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारhusband and wifeपती- जोडीदार