शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रेखा जरे यांची हत्या का केली? चर्चेला उधाण; हनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग की आणखी काही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 06:04 IST

Rekha Jare Murder Case : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून याच हत्याकांडाची चर्चा आहे. हनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग, नाजूक प्रकरण अशा एक ना अनेक विषयांची चर्चा या हत्याकांडाच्या निमित्ताने सुरू झाल्या आहेत.

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात सध्या पोलिसांसह प्रत्येकाला एकच प्रश्न सतावत आहे. तो म्हणजे पत्रकार बाळ बोठेने त्यांची हत्या का केली? बोठेच्या अटकेनंतरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. बोठे हा गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून याच हत्याकांडाची चर्चा आहे. हनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग, नाजूक प्रकरण अशा एक ना अनेक विषयांची चर्चा या हत्याकांडाच्या निमित्ताने सुरू झाल्या आहेत. मध्यंतरी बोठे याने ‘हनीट्रॅप’ विषयावर एक वृत्तमालिका प्रकाशित केली होती. यामध्ये त्याने नगरमधील नामांकित व्यक्तींचा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता, तर काहींवर आरोपही केले होते. मात्र काहीच बाहेर आले नाही. त्यामुळे ही वृत्तमालिका का प्रकाशित केली होती, त्याचीही सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे बोठेकडून मिळतील.  राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहरातील  महिलेने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन बाेठेच्या विरोधात आरोप केले होते. त्यानंतर, काही दिवसांतच त्याच महिलेने पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आरोप मागे घेतले होते. त्यावेळी ही महिलाही बोठे याच्या दबावाखाली होती का? अशीही चर्चा होत आहे. तिघा आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढदरम्यान, जरे यांच्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले सागर उत्तम भिंगारदिवे, आदित्य सुधाकर चोळके व ऋषिकेश उर्फ टप्या वसंत पवार यांच्या पोलीस कोठडीत ११ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. बोठेची अभ्यास मंडळावरील नियुक्ती रद्द होणाररेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळावरील नियुक्ती रद्द करण्याबाबत कुलगुरूंनी माहिती घेतली असून, मंडळाच्या अध्यक्षांनी गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती कुलगुरूंना दिली आहे.  दोन वर्षांपूर्वी बोठे याची पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर