शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

खुल्या बारमध्ये छापामार कारवाई का नाही? अर्थपूर्ण उघड गुपीत

By नरेश डोंगरे | Updated: December 26, 2022 19:27 IST

अमूक एवढ्या दारूच्या केसेस केल्याचे टार्गेट पोलीस अन् एक्साईज विभागाच्या पथकांना शिर्षस्थ अधिकाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे या दोन्ही विभागाची बहुतांश पथके टार्गेट पूर्ण करण्यासाठी तोडक्या-मोडक्या कारवाया करतात.

नागपूर -  परवाना नसताना दारू उपलब्ध करून देणे अथवा ती पिण्यासाठी व्यवस्था करून देणे कायदेशीर गुन्हा आहे. पोलीस किंवा उत्पादन शुल्क विभागाकडून त्यावर धडक कारवाई होऊ शकते. मात्र, नागपूर शहर किंवा ग्रामीण भागात बिनबोभाट चालणाऱ्या खुल्या (अवैध) बारवर पोलीस किंवा एक्साईज (उत्पादन शुल्क) विभागाचे पथक छापा घालून कारवाई करताना दिसत नाही. त्यामागच्या अर्थपूर्ण कारणांची सर्वत्र चर्चा होत आहे.

अमूक एवढ्या दारूच्या केसेस केल्याचे टार्गेट पोलीस अन् एक्साईज विभागाच्या पथकांना शिर्षस्थ अधिकाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे या दोन्ही विभागाची बहुतांश पथके टार्गेट पूर्ण करण्यासाठी तोडक्या-मोडक्या कारवाया करतात. नवख्या दारू विक्रेत्यांना अथवा छोट्या छोट्या सावजी वाल्यांवर कारवाई करून त्याचा सोशल मीडियावर पद्धतशीर गाजावाजा केला जातो आणि लांबलचक प्रेस नोट काढून विविध वृत्तपत्राकडे पाठविली जाते. 

प्रत्यक्षात मात्र धडाकेबाज कारवाई अपवादाने बघायला मिळते. गेल्या महिन्यात ग्रामीणच्या सिमेवर कुही मार्गावर पोलिसांनी चक्क नकली दारूचा कारखाना उघडकीस आणला. त्यामुळे हादरलेल्या एक्साईज विभागाने नंतर त्याच भागात दारूचे घबाड पकडण्याची कारवाई केली. तत्पूर्वी अन् या कारवाईनंतर मात्र सारे शांत झाले. ठिकठिकाणी पुन्हा दारू तस्कर अन् दारू विक्रेते सक्रिय झाले. 

अनेकांचा चर्चित ढाब्यांवर श्रमपरिहारशहराच्या आत अन् आऊटरला असलेल्या मोठमोठ्या ढाबा कम रेस्टॉरेंटवर पोलीस किंवा एक्साईजवाले धडाकेबाज कारवाई करताना दिसत नाही. उलट काही जण या ढाब्यांवरचे नियमित ग्राहक असल्याचे दिसून येते. अनेक जण तेथे श्रमपरिहार करतानाही दिसतात.  

कारवाई नाही मात्र...ढाबा कम रेस्टॉरंट्सवर धडाकेबाज कारवाई न करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे ‘रेग्युलर व्हिजिट’ होय. काही जणांचे इप्सित साध्य होत असल्याने पोलीस तसेच उत्पादन शुल्क विभागाचे पथक छापेमार कारवाईऐवजी ‘मंथली भेटी’वर समाधान मानत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :nagpurनागपूर